मच्छीमारांच्या गळाला लागला '2 लाखचा मासा'; मुंबई बाजारात '5 लाख' किंमत राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

मच्छीमारांच्या गळाला लागला '2 लाखांचा मासा'; मुंबई बाजारात '5 लाख' किंमत

22 किलो वजनाचा घोळ मासा (Ghol fish) सापडला. या घोळ माशाने चार मच्छीमाराना लखपती बनविले आहे.

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड: श्रीवर्धन तालुक्यातील (Raigad Shrivardhan) जीवना बंदरातील समुद्रात मच्छीमारांनी मासळी पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात 22 किलो वजनाचा घोळ मासा (Ghol fish)  सापडला. या घोळ माशाने चार मच्छीमाराना लखपती बनविले आहे. या माशांच्या लिलावात स्थानिक व्यापाऱ्याने चक्क 2 लाख 61 हजाराची बोली लावून हा मासा विकत घेतला आहे. विशेष बाब म्हणजे मुंबई बाजारात हा मासा तब्बल 5 ते 6 लाखांना विकला जाण्याची शक्यता आहे.

श्रीवर्धन मधील जीवना बंदरावरील मच्छिमार जयेंद्र पाटील, उद्देश पावशे, हेमंत चुनेकर व त्यांचे आणखी एक साथीदार यांनी समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाळी लावून ठेवली होती. जाळी लावल्यानंतर जाळ्यात मोठी मासळी अडकली असून ती सुटण्यासाठी धडपड करीत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी मच्छीमारांनी तातडीने जाळी गोळा करून किनाऱ्यावर आणले. तर त्यात मोठा घोळ मासा अडकल्याचे निदर्शनात आले.

22 किलो वजनाचा एवढा मोठा घोळ मासा क्वचितच जाळ्यात सापडतो. घोळ मासा बंदरात आणल्यानंतर त्याची बोली सुरू झाली. श्रीवर्धन मधीलच मासळी व्यापारी तोडणकर यांनी तब्बल 2 लाख 61 हजार रुपये बोली लावून घोळ मासा विकत घेतला. मुंबई बाजारात या माशाला दुप्पट ते तिप्पट भाव मिळण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. पावसाळ्यानंतर सुरू झालेल्या पहिल्याच मासेमरीत श्रीवर्धनच्या चार मच्छीमारांचे नशीब चमकले आहे.

शल्यचिकित्सेत धागे बनविण्यासाठी केला जातो वापर

घोळ मासा हा खाण्यास चविष्ट असून तो गुणकारीही आहे. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रासाठीही उपयुक्त आहे. या माशाचे जठर व फुफ्फुस आदी अवयवांद्वारे शल्यचिकित्सेला लागणारे धागे (टाके) बनविले जातात. त्यामुळे माशाला एवढी किंमत मिळते. जुलै ते सप्टेंबर दरम्यान हा मासा समुद्र किनाऱ्यालगत येतो.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील इळेगाव येथे पोलिसांवर वाळू माफियांचा हल्ला

फ्लॅटच्या 7/12 साठी लवकरच कायदा, फ्लॅटधारकांना आता डिजिटल प्रॉपर्टी कार्ड

विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण बंदी, भाजप आमदाराच्या शाळेत अजब फतवा

Team India Squad : टी २० मालिकेआधी टीम इंडियात मोठा बदल; गंभीरचा सर्वात विश्वासू खेळाडू बाहेर, 'विदर्भ एक्स्प्रेस'ची संघात एन्ट्री

एक-दोन दिवसात कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही; जरांगेंच्या मागण्यांवर जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी थेट नियमच सांगितला

SCROLL FOR NEXT