uddhav thackeray and shrikant shinde  saam tv
महाराष्ट्र

Shrikant Shinde On Uddhav Thackeray: 'कष्ट टाळू मुख्यमंत्री ते ‘कष्टाळू’ मुख्यमंत्री'; PM मोदींच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय.

Ruchika Jadhav

Shrikant Shinde On Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आपल्या संपूर्ण कुटुंबासह त्यांनी मोदींची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मोदींनी एकनाथ शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. यावरून खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. (Latest Political News)

"कष्ट टाळू मुख्यमंत्री ते ‘कष्टाळू’ मुख्यमंत्री; महाराष्ट्राचा बदलता राजकीय प्रवास!" असं ट्वीट खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्वीटवरुन आता ठाकरे गटातून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मोदींची भेट घेतल्यावर या बाबात ट्वीटरवरुन माहिती दिली होती. "देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या मा.नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे,सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या." असं ट्वीट एकनाथ शिंदेंनी केलं होतं.

आपल्या ट्वीटमध्ये पुढे त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले होते. यावर मोदींनी देखील ट्वीट करत एकनाथ शिंदेंचे कौतुक केले. यावेळी गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री असा उल्लेख मुख्यमंत्र्यांचा करण्यात आला.

या दोघांमधील संवादाचे ट्वीट आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर करत खासदार श्रीकांत शिंदेंनी (Shrikant Shinde) उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केलीये. त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात वादळी वाऱ्यासह पुन्हा पावसाचं आगमन! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Gym Or Yoga: फिट राहायचंय आणि वजनही कमी करायचंय? जिम की योगा, काय ठरेल बेस्ट?

Maharashtra News Live Update: श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद

मोठी बातमी ! भाजपच्या नेत्यावर हद्दपारीची कारवाई, राजकीय वर्तुळात खळबळ

Home Care Tips: घर चमकवण्यासाठी महागडी क्लिनर नको; चहापत्तीचा करा 'असा' उपयोग

SCROLL FOR NEXT