Panchvati Police Station Saam Tv
महाराष्ट्र

दुकान फाेडणारा चाेरटा जेरबंद; पंचवटी पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी

१० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक - पंचवटीतील सरदार चौकातील साईबाबा कुंकू भांडार हे दुकान फाेडणाऱ्या चाेरट्यास पंचवटी पाेलिसांनी (Police) जेरबंद केले आहे. अन्सार अत्तार रहाणार नांदगाव असे संशयिताचे नाव आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचेकडून १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

२५ मे राेजी रात्री १ वाजता चाेरट्याने कुंकवाचे दुकान फाेडून २३ हजार ८०० रुपयांचा माल चोरून नेला हाेता. त्याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेऊन त्याला अटक केली.

पाेलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त मधुकर गावीत यांनी पंचवटी पाेलिसांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक (प्रशासन) रणजित नलवडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक सत्यवान पवार व अंमलदार यांनी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून तांत्रिक पध्दतीने तपास केला. त्यात फुटेज मधील अनोळखी व्यक्ती हा भद्रकाली परीसरात फिरत असल्याची माहीती मिळाल्यावर त्याला पकडण्यात आले. या प्रकरणी पुढील तपास हवासदार सुनिल शेवाळे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Childhood Cancer: पालकांनो! मुलांमध्ये दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; कॅन्सरचा असू शकतो सुरुवातीचा संकेत

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

SCROLL FOR NEXT