अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चा दरम्यान दुकानांची तोडफोड! पहा Video अरुण जोशी
महाराष्ट्र

अमरावतीत मुस्लिम समाजाच्या मोर्चा दरम्यान दुकानांची तोडफोड! पहा Video

त्रिपुरा राज्यात मुस्लिम बांधवावर सातत्याने अत्याचार केले जात आहे. मस्जिदींची तोडफोड केली जात आहे.

अरुण जोशी

अमरावती : त्रिपुरा राज्यात मुस्लिम बांधवावर सातत्याने अत्याचार केले जात आहे. मस्जिदींची तोडफोड केली जात आहे. याबराेबरच मुस्लिमधर्म संस्थापक महंमद पैगंबर यांच्या विषयी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अमरावती मध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा निषेध केला होता.

हे देखील पहा :

मात्र 15 ते 20 हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले, यावेळी मोर्चा करांनी जयस्तंभ चौकातील व शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची प्रचंड तोडफोड केली तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली. तर अनेक भागात तुफान दगडफेक केली. दरम्यान, मोर्चा करांनी भाजप विरोधात व आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलीस व आंदोलक आमने सामने देखील आले होते.

तर यात दोन पोलीस कर्मचारी दगडफेक केल्याने जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान या मुस्लिम मोर्चाला पूर्णपणे गालबोट लागले असून शहरात तणाव निर्माण झाला आहे. तर या विरोधात भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी व भाजप नेते तुषार भारतीय सह भाजप कार्यकर्ते रस्त्यावर आले होते. तर तातडीने अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्या मुस्लिम समाजाच्या लोकांवर कारवाई करून अटक करण्याची मागणी भाजपने केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

ठाकरेंचे खासदार शिंदेंकडे का गेले? राज ठाकरेंनी सांगितलं अमित शहा यांचं कनेक्शन

SCROLL FOR NEXT