Latur Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Latur News : बायको नांदायला येत नसल्याने नवऱ्याला राग अनावर; सासूसोबत केलं भयंकर कृत्य

ही थरारक घटना लातूर जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

दीपक क्षीरसागर

लातूर : बायको (Wife) नांदायला येत नसल्याने जावयाने सासूवर कोयत्याने हल्ला केला. त्यानंतर स्वतःला जाळून घेतलं. इतकंच नाही तर, त्याने स्वतःच्या मुलावर देखील हल्ला केला. या घटनेत सासू आणि आरोपी जावायाचा मृत्यू झाला असून मुलगा जखमी झाला आहे. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना लातूर (Latur) जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. (Latur Crime News)

रजनीकांत वेदपाठक आणि चंद्रसेना संजय वेदपाठक अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, रजनीकांत यांची पत्नी आणि मुलगा कार्तिक हे त्यांच्या माहेरी राहत होते. पत्नी घरी नांदायला येत नसल्याने जावई रजनीकांत यांचा राग 50 वर्षीय सासू चंद्रसेना संजय वेदपाठक यांच्यावर राग होता.

दरम्यान, मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जावई रजनीकांत हा लातूर शहरातील वीर हणमंतवाडी भागात राहत असलेली सासू चंद्रसेना याच्या घरी आला. यावेळी रजनीकांत याने कोयत्याने सासू चंद्रसेना यांच्यावर हल्ला केला. इतकंच नाही तर, आपल्या ७ वर्षीय मुलावर देखील त्याने कोयत्याने वार केले. (Latur Latest Crime News)

या थरारक घटनेत सासू चंद्रसेना यांचा जागीच मृत्यू तर कार्तिक हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर रजनीकांत वेदपाठक याने स्वतः वर पेट्रोल टाकून जाळून घेतले. आरोपी रजनीकांत याची पत्नी एका खाजगी दुकानात कामाला होती. सदरील घटनेची माहिती मिळताच ती घटनास्थळी दाखल झाली. या घटनेने लातूर शहरात खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT