Shocking News Maharashtra Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News : मैत्रिणीनेच रचला कट, १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Shocking Crime News : भंडाऱ्यात १६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात पीडितेच्या मैत्रिणींसह तिच्या प्रियकराचा समावेश आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

भंडाऱ्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भंडाऱ्याच्या मोहाडी गावात १६ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे पीडितेच्या मैत्रिणीनेच तिच्या लैंगिक अत्याचाराचा कट रचल्याचे पोलीस तपासादरम्यान उघडकीस आले आहे. ही घटना २६ जून रोजी घडली असून पोलिसांनी या प्रकरणी पीडितेच्या मैत्रिणींसह तिघांना अटक केली आहे.

भंडाऱ्याच्या मोहाडी गावात एक तरुणी तिच्या मैत्रिणीला घेऊन २६ जून रोजी बॉयफ्रेंडच्या घरी गेली होती. यावेळी तरुणीच्या बॉयफ्रेंडच्या घरी तिच्या बॉयफ्रेंडसह अन्य दोघे मित्रही आधीच उपस्थित होते. यावेळी तरुणीने आणि अन्य दोघांनी त्यातील एकाला तरुणीच्या मैत्रिणीसोबत बळजबरीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करायला लावले.

घाबरलेल्या पीडितेने घटनास्थळावरुन पळ काढत घर गाठले. घडलेली आपबिती कुटुंबाला सांगितली मात्र, समाजात बदनामी आणि घडलेल्या प्रसंगानं पीडिता दहशतीत होती. पीडीतेचा भाऊ बाहेरगावरून आल्यानंतर त्यानं बहिणीला विश्वासात घेत मोहाडी पोलिसात आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. आरोपी तरुणी, प्रणय पाटील (२३), निकुंज मेहर (२४) आणि बाल्या बोंद्रे (४५) अशा चौघांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे.

दाखल केलेल्या तक्रारीवरून कलम ६४(२)(i)७०(२) बाल लैंगिक अत्याचार अन्वये ४,६,८ पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही आरोपींना मोहाडी पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

महायुतीत बंडखोरी? सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

तुम्हीही हेल्थ इन्शुरन्स घेतलाय? मग ही बातमी नक्की वाचा! 1 जानेवारीपासून नवा नियम येणार

SCROLL FOR NEXT