Bhandara News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : भंडारा हादरलं! शिवमंदिरात दुर्गा देवीच्या मूर्तीजवळ नवजात बालक मृतावस्थेत आढळलं; नेमकं प्रकरण काय?

Bhandara News : तुमसर तालुक्यातील राजापूर–नाकाडोंगरी मार्गावरील शिवमंदिरात दुर्गा देवीच्या मूर्तीजवळ पहाटे एक नवजात बालक मृतावस्थेत आढळले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Alisha Khedekar

  • तुमसरच्या शिवमंदिरात दुर्गा मूर्तीजवळ नवजात बालक मृतावस्थेत आढळले

  • कापडात गुंडाळलेले बालक हालचाल करत नसल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली

  • गोबरवाही पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी पाठवला

  • पोलीस तपास सुरू

शुभम देशमुख, भंडारा

माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. तुमसर तालुक्यातील राजापूर-नाकाडोंगरी मार्गावर मंदिर परिसरातील दुर्गा देवीच्या मूर्तीजवळ पहाटे एक नवजात बालक मृतावस्थेत आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलीस सविस्तर तपास करत आहेत.

राजापूर-नाकाडोंगरी मार्गावर शिवमंदिर असून या परिसरात दररोज नागरिक सकाळी फिरायला जातात. आज नेहमीप्रमाणे काही नागरिक पहाटेच्या सुमारास फिरण्यासाठी गेले असता, त्यांना मंदिरातील दुर्गा देवीच्या मूर्तीजवळ एक कापडात गुंडाळलेले छोटे बाळ दिसून आले.

जवळ जाऊन पाहिले असता ते अर्भक हालचाल करत नव्हते. नागरिकांनी तातडीने याची माहिती आजूबाजूच्या लोकांना आणि गोबरवाही पोलीस स्टेशनला दिली.घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अर्भकाचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

अर्भक रात्रीच्या अंधारात मंदिरात कोणी आणून सोडले? आणि बालकाचा मृत्यू थंडीमुळे झाला की त्याला मृतावस्थेतच तिथे टाकण्यात आले, याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अशा प्रकारे पोटच्या गोळ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या निर्दयी व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?

Manoj Jarange: जरांगे आणि सरकार आमनेसामने, चर्चेसाठी अंतरवालीत जाण्यास विखेंचा नकार

Rahul Gandhi: राहुल गांधी घराणेशाही मोडणार? 2029 साठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT