Pandharpur Crime Saam TV
महाराष्ट्र

धक्कादायक! दोन चिमुकल्यांना विष पाजून आईची आत्महत्या

Pandharpur Crime : पेनुर येथे येथील एका महिलेने आपल्या ७ महिने आणि ३ वर्षाच्या चिमुकल्याला विष पाजत आत्महत्या केली आहे

साम टिव्ही ब्युरो

पंढरपूर : मोहोळ (Mohol) तालुक्यात एक भयंकर घटना घडली आहे. पेनुर येथे येथील एका महिलेने आपल्या ७ महिने आणि ३ वर्षाच्या चिमुकल्याला विष पाजत आत्महत्या केली आहे. संबधित महिलेने अगोदर दोन्ही चिमुकल्यांना विष पाजलं आणि त्यानंतर स्वत:ही विष प्राशन केलं. या घटनेत ७ महिन्याच्या चिमुकलीसह संबधित महिलेचाही मृत्यू झाला आहे. तर ३ वर्षाच्या चिमुरड्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. (Pandharpur Crime News)

प्रियंका सूरज चौरे आणि सुप्रिया सूरज चौरे असं मृत्युमुखी पडलेल्या मायलेकींचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील पेनुर येथील राहणाऱ्या प्रियंका चौरे नामक महिलेनं ७ महिन्यांची चिमुकली सुप्रिया चौरे आणि ३ वर्षाच्या चिमुरडा शंभुराजे या दोन्ही पोटच्या लेकरांना सुरूवातीला विष पाजलं त्यानंतर प्रियंका यांनीही विष प्राशन केले.

या घटनेत प्रियंका आणि सुप्रियाचा मृत्यू झाला. तर सूरज याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, महिलेने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्यापही माहिती मिळालेली नाही. या घटनेनंतर पंढपूर शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी सदरील घटनेचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Digestive Health : पोट साफ होत नाही? 'ही' असू शकतात लक्षणे; जाणून घ्या कारणे आणि उपाय

Raigad Fort : तटबंदी नाही, बुरुज नाहीत; तरीही खास आहे रायगडचा 'हा' किल्ला

Maharashtra News Live Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात SIT स्थापन; २३ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक

Cotton Saree Designs: महिलांसाठी कॉटन साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न नवरात्री आणि करवा चौथसाठी ठरतील बेस्ट

Dombivli : डोंबिवलीत उच्चभ्रू सोसायटीत जोरदार हाणामारी; मारहाणीचे CCTV फुटेज व्हायरल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT