Sindhudurga News Saam Tv
महाराष्ट्र

Onkar Elephant : नदीत अंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर अमानुष हल्ला, अंगावर सुतळी बॉम्ब फेकले अन्...

Sindhudurga Onkar Elephant News : सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात ओंकार नावाच्या हत्तीवर सुतळी बॉम्ब फेकण्याची अमानुष घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे प्राणीप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त आहे.

Alisha Khedekar

सिंधुदुर्गात ओंकार नावाच्या हत्तीवर नदीत आंघोळ करत असताना बॉम्बफेक

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

वनकर्मचारी उपस्थित असतानाही हल्ला झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह

प्राणीप्रेमी आणि पर्यावरण संघटनांकडून कठोर कारवाईची मागणी

सिंधुदुर्गातून मानव जातीला काळिमा फासणारी धक्कदायक घटना समोर आली आहे. सावंतवाडी तालुक्यात गेल्या दीड महिन्यांपासून वावरत असलेल्या ओंकार नावाच्या हत्तीला नदीपात्रात डुंबत असताना सुतळी बॉम्ब फेकून देण्याचा अमानवी आणि भयंकर प्रकार समोर आला आहे. या घटनेचे व्हिडिओ देखील उघडकीस आला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, तुळसाण येथे नदीत ओंकार हत्ती शांतपणे पाण्यात आंघोळ करत असताना काही व्यक्तींनी त्याच्या शेजारीच पाण्यात चक्क बॉम्ब फेकले. त्या आवाजाने आणि फटाक्याने ओंकार हत्ती घाबरला. व्हिडिओ मध्ये चित्रित झाल्याप्रमाणे फटाक्यांच्या तीव्र आवाजाला घाबरून हत्तीने काठापासून पाण्याच्या आतल्या बाजूला पळ काढला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

सावंतवाडी तालुक्यातील काही गावांमध्ये गेला महिनाभर धुमाकूळ घालणाऱ्या 'ओंकार' हत्तीला दांड्याने मारहाण करून पिटाळून लावतानाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर जनतेतून वन विभाग आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे दांड्याने मारहाण होत असताना वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या डोळ्या देखत हा प्रकार सुरु होता त्यामुळे हत्तीला दांड्याने मारहाण करणाऱ्या व तेथे उपस्थित असलेल्या वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या कृत्यांमुळे प्राणीमित्रांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. बॉम्ब फेकून जखमी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल आता प्राणी प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT