Nanded  संतोष जोशी
महाराष्ट्र

ट्रकसह चालकाचा जळून मृत्यू; नांदेडमधील धक्कादायक घटना

नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड: नांदेड मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका ट्रकसह चालकाचा जळून मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना नांदेड (Nanded) वाघाळा परिसरात मध्यरात्री घडली आहे. नितीन सटवाजी कांबळे असं मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. ट्रक चालकाचा अक्षरशः जळून कोळसा झाला आहे. ट्रक कॅबीन ही जळून खाक झाली आहे. या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. नितीन कांबळे असे ट्रक चालकाचे नाव आहे. हा मालवाहतूकीचे (Freight) काम करत होता.

हे देखील पहा-

घटनास्थळावर ट्रकच्या जवळून एक विद्युत वाहिनी गेली आहे. त्यामुळे नितीन कांबळेचा मृत्यू (Death) झोपीत असताना विजेचा प्रवाह ट्रकमध्ये (Truck) उतरल्याने झाला का काही घातपात आहे हे पोलीस तपासात करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण (Rural) पोलीस ठाण्याची टीम घटनास्थळावर दाखल झाली आहे. दरम्यान जळालेला व्यक्ती हा नितीन कांबळे यांचा असल्याची माहिती हळदा गावचे पोलिस (Police) पाटील यांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

SCROLL FOR NEXT