Bhusawal Crime news Saam Tv
महाराष्ट्र

महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये महिलेचा विनयभंग, पती अन् कुटुंब असूनही ५ जणांची पीडितेवर वाईट नजर

Molestation Case in Bhusawal: धावत्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये महिलेचा विनयभंग. पाच आरोपी अटकेत, दोन अल्पवयीनांचा समावेश. शेगाव ते जळगाव प्रवासादरम्यान घडली घटना.

Bhagyashree Kamble

  • धावत्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये महिलेचा विनयभंग

  • पाच आरोपी अटकेत, दोन अल्पवयीनांचा समावेश

  • शेगाव ते जळगाव प्रवासादरम्यान घडली घटना

  • रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

धावत्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. शेगाव ते जळगाव प्रवासादरम्यान हा भयंकर प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी तपास करीत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये दोन अल्पवयीन असल्याची माहिती आहे. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

भुसावळमध्ये धावत्या महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी तक्रारदार महिला आपल्या पती आणि कुटुंबीयांसह शेगावहून जळगावकडे जनरल डब्यातून प्रवास करीत होती. डब्यात प्रचंड गर्दी असल्याचा फायदा घेत संशयितांनी पीडित महिला आणि तिच्या नातेवाईकांशी अश्लील वर्तन केलं.

एवढंच नव्हे तर तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या महिलेलाही त्रास दिला. दरम्यान, गाडी भुसावळ स्थानकात पोहोचताच महिलेच्या नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर इतर प्रवाशांच्या मदतीने पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींमध्ये २ अल्पवयीन असल्याची माहिती आहे. या प्रकरणी शेगाव रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरूआहे.

या घटनेनंतर महिला एक्स्प्रेसमध्येही असुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित होत आहे. पीडित महिला आपल्या पती आणि कुटुंबियांसोबत असूनही हा भंयकर प्रकार घडला आहे. त्यामुळे एक्स्प्रेसमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: थोर महापुरुषांचा इतिहास शिकवणारे पुस्तक बदलवण्यात आल्याने मंत्री दादा भुसे यांनी केली नाराजी व्यक्त

Panvel Tourism : फॅमिली ट्रिपसाठी पनवेलजवळील सुंदर लोकेशन, वीकेंडला 'येथे' होते पर्यटकांची गर्दी

Thursday Horoscope: कामाच्या ठिकाणी राहा सावध, 5 राशींची होणार चांदीच चांदी; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Navi Mumbai: पाढे पाठ नसल्याने दिली भयंकर शिक्षा, शिक्षिकेने विद्यार्थिनीला उलाथन्याने दिले ४० फटके

अजित पवारांच्या प्रेमकोर्ट बंगल्यावरील विलीनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरेही? खरं काय आणि खोटं काय? VIDEO

SCROLL FOR NEXT