Beed/ Parli  विनोद जिरे
महाराष्ट्र

खळबळजनक! गाढवाच्या चोरीच्या घटनेनंतर आता घरासमोर बांधलेल्या शेळ्यांची चोरी

बीडच्या परळीतील धक्कादायक घटना

विनोद जिरे

बीड: बीडच्या परळीत पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गाढवाच्या (donkey) चोरीनंतर आता शेळ्यांची (Goat) चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घरासमोर बांधलेल्या 12 शेळ्या अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना, परळी (Parli) शहरातील आंबेडकर नगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी शेळी पालक कैलास मल्हारी खंडाळे यांच्या तक्रारीवरून, संभाजीनगर पोलीस (Police) ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

हे देखील पहा-

यामध्ये शेतकऱ्याचे तब्बल 72 हजारांचे नुकसान झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी परळी शहरात तब्बल 140 गाढवांची चोरी झाली होती. आता शेळ्यांची चोरी झाल्याने पशुपालकांत भीती निर्माण झाली आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान याप्रकरणी परळीच्या संभाजी नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवारांच्या निधनानंतर CM देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Politics : तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडून निसटल्या? मुख्यमंत्री फडणवीस मांडणार अर्थसंकल्प

गुजरातला जास्त, महाराष्ट्राला कमी... महाराष्ट्राचे खासदार दिल्लीत भांडले पाहिजेत, अर्थ संकल्पावर बच्चू कडूंचा घणाघात

Monday Horoscope : अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका, अन्यथा...; ५ राशींच्या लोकांना प्रगतीचा मार्ग गवसणार

Ladki Bahin Scheme: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार २१०० रुपये, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT