Nashik News saam tv
महाराष्ट्र

बिलासाठी अडवला पोलिसाचा मृतदेह; नाशिकच्या खासगी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार

बिलाच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी अडवून धरला मृतदेह; घटनेमुळे पोलीस दलात संतापाचं वातावरण

अभिजीत सोनावणे

नाशिक - बिलासाठी पोलिसाचा (Police) मृतदेह अडवून धरल्याचा धक्कादायक प्रकार नाशकात समोर आला आहे. जिल्हा पोलीस दलातील एका सहायक फौजदाराच्या बाबतीतही असाच प्रकार घडला आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या श्रीराम वानखेडे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हे देखील पहा -

मात्र बिलांच्या कागदपत्रांची पूर्तता होत नाही तोपर्यंत त्यांचा मृतदेह ताब्यात देण्यास रुग्णालय प्रशासनानं नकार देत कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी मृतदेह अडवून धरण्यात आला. अखेर राजकीय पक्षाच्या नेत्याच्या मध्यस्थीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र या प्रकारामुळे पोलीस दलामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

Fact Check : 7 तारखेला पगार न मिळाल्यास बॉसला जेल? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? जाणून घ्या

Bihar Politics : बिहारमध्ये काँग्रेसचं पानिपत; कोणत्या चुका ठरल्या पराभवाचं कारण?

SCROLL FOR NEXT