परीक्षा  Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक; सरकारी बाबूंनी आरोग्य विभागाचा पेपर १५ लाखांना विकला!

पेपर फुटीच्या या प्रकरणात आणखीन बडे मासे अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तथापि , फुटलेल्या पेपरच्या परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी आता विद्यार्थी करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत सुरुवातीपासूनच प्रचंड गदारोळ झाल्याचे आपण पहिले आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड मनःस्ताप सहन केला आहे. अचानकपणे रद्द झालेली परीक्षा, ज्या कंपनीच्या माध्यमातून हि भरती परीक्षा घेण्यात आली त्या न्यासा या संस्थेबाबत निर्माण झालेले प्रश्नचिन्ह आदी सर्व बाबी नजरेआड करून अखेर परीक्षा संपन्न झाली. मात्र, या परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याची माहिती विद्यार्थ्यांनी समोर आणली आणि या गैरप्रकाराची व्याप्ती अजूनही वाढताना दिसत आहे.

आरोग्य विभागाच्या नोकर भरती 'गट ड' चा पेपर सरकारी अधिकाऱ्यांनीच फोडला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. आरोग्य भरतीचा पेपर परीक्षेआधीच आरोपींनी १५ लाख रुपयांना विकला होता. साम टीव्हीने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रकरणात आरोपींविरोधात पुणे सायबर पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले आहेत.

यामध्ये आरोग्य विभागाच्या मुख्याधिकाऱ्यासह ५ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून, 'गट ड' बरोबरच आरोग्य विभागाच्या 'गट क' पेपरफुटीचे पुरावे आता सापडल्याची माहिती समोर येत आहे. आरोपींच्या मोबाईल मध्ये 'गट क' साठी कोणाला नोकरी लावायची यासंदर्भातली यादीच सापडली आहे.

लातूरच्या आरोग्य विभागातील मुख्याधिकारी प्रशांत बडगीरे, बीडच्या मेंटल हॉस्पिटलचा वैद्यकीय अधिकारी संदीप जोगदंड, उस्मानाबाद आरोग्य विभागातील क्लर्क राजेंद्र सानप व श्याम मस्के या आरोपींनी हा पेपर फोडल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या सर्व गैरप्रकारावर राज्यभरातील आरोग्य विभागाच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पेपरफुटी प्रकरणात आणखी काय पुरावे हवे आहेत? जेणेकरून या आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल व सध्याचा पेपर रद्द करून परीक्षा पुन्हा घेण्यात येतील असा संतप्त सवाल विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT