धक्कादायक! गळा आवळून १५ वर्षीय मुलीने केली आईची हत्या Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! गळा आवळून १५ वर्षीय मुलीने केली आईची हत्या

गेल्या आठवड्यात मुलीने हत्येची कबुली दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबई - कराटे बेल्टने गळा आवळून १५ वर्षीय मुलीने आपल्याच आईची निर्घृण हत्या Death केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ऐरोलीमध्ये ३० जुलै रोजी ही घटना घडली आहे. आईने अभ्यासाचा तगादा लावल्याने मुलाने आईचा राग मनात धरून ठेवला होता. याच रागाच्या भारात मुलीने आईची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

पीडित महिला वारंवार वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा अभ्यास Mediacl Exam करण्यासाठी मुलीच्या मागे लागत होती. त्यामुळे या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं.

हे देखील पहा -

गेल्या आठवड्यात मुलीने हत्येची कबुली दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. रबाळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ दिवसांपूर्वी मुलीने आई विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी संपर्क साधला होता. यानंतर पोलिसांनी मृत महिलेच्या पालकांना समुपदेशनासाठी बोलावले होते.

३० जुलैला या दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं. या भांडणात मुलीने आईला जोरदार धक्का दिला ज्यानंतर त्यांच्या डोक्याला जखम झाली. त्यानंतर मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या केली. मुलीने आईचा मृतदेह बेडवर ठेवत आत्महत्या दर्शवण्यासाठी आईच्या मोबाइलवरुन मामाला मेसेज देखील पाठवला.

मात्र महिलेचे शवविच्छेदन केले असता गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याने मुलीला विश्वासात घेतले असता मुलीने हत्येची कबुली दिली आहे. अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी या मुलीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT