YOUTH KILLED IN SANGLI OVER SAME-SEX DISPUTE Saam Tv News
महाराष्ट्र

Shocking: सांगली हादरली! शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती, नकार देताच समलैंगिक मित्रांनी जीव घेतला

Sangli Homosexual Clash: सांगलीतील आरग येथील तलावात सुजल पाटील याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळला; दोन अल्पवयीन मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Bhagyashree Kamble

समलैंगिक संबंधाला नकार दिल्याने अल्पवयीन मित्रांनी मिळून एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा सर्व प्रकार सांगलीच्या आरग येथे घडला. आर्मीमधील एका तलावात त्याचा मृतदेह आढळला. त्याचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पडलेला होता. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तसेच दोघा अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतलं आहे.

सुजल पाटील (वय वर्ष २१) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो सांगलीतील आरग येथील रहिवासी होता. त्याचे दोन मित्र होते. दोघेही समलैंगिक असल्याची माहिती आहे. घटनेच्या दिवशी सुजल आणि त्याचे दोघे मित्र बेळंकी या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यानंतर तिघेही दुचाकीवरून घरी परतत असताना, बेळंकी रोडवरील तलावाजवळ पोहोचले.

सुजलचे दोघेही मित्र दारूच्या नशेत होते. दोघा मित्रांनी सुजलवर जबरदस्ती केली. तसेच समलैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुजलने विरोध केला. त्याने दोघा मित्रांना ढकलले. सुजलने विरोध करताच दोघांना राग अनावर झाला. चिडलेल्या दोघा मित्रांनी सुजल याला मारहाण केली. त्याला अर्धनग्न केलं. तसेच त्याला पाण्यात बुडवून ठार केलं.

नंतर आरोपींनी मृतदेह तलावात फेकून पळ काढला. ग्रामस्थांनी तलावात मृतदेह तरंगत असल्याचं पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. या प्रकरणी मिरज ग्रामिण पोलिसांनी तपास करीत सुजलच्या दोघा अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतलं असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, समलैंगिक संबंधातून अल्पवयीन मित्रांकडूनच मित्राचा खून केल्याच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: हातभट्टीवरची दारू, मिथेनॉल ऑनलाइन मागवलं; २२ जणांचा जीव घेणाऱ्या विषारी दारूकांडाचा घटनाक्रम उघड, हादरवणारी माहिती समोर

Maharashtra News Live Update: मायेपुढे बिबट्याही नमला; सासूसाठी सुनबाई आणि नातू बिबट्याला भिडले!

Brain Tumour : 'ही' ६ लक्षणे अजिबात इग्नोर करू नका, अन्यथा ब्रेन ट्युमर झाल्याचेही समजणार नाही

Murud-Janjira Fort : मुरुड-जंजिरा किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा? समुद्रात दडलंय रहस्य

Aadhaar Card Rule: आधार कार्डमध्ये नाव, मोबाईल नंबर अन् पत्ता किती वेळा बदलता येतो?

SCROLL FOR NEXT