Shocking Amravati Crime Saam tv news
महाराष्ट्र

जागेचा वाद टोकाला! महिलेच्या झिंज्या धरत तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारलं; घटनेचा VIDEO व्हायरल

Woman Beaten Video Goes Viral: विर्शी गावात जागेच्या वादातून तीन पुरुषांनी एका महिलेला जबर मारहाण केली. मारहाण करतानाचा व्हिडीओ कैद. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

Bhagyashree Kamble

  • अमरावती जिल्ह्यातील विर्शी गावात जागेच्या वादातून एका महिलेला जबर मारहाण.

  • तीन पुरुषांनी महिलेचे केस ओढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

  • हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • वलगाव पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

माणुसकीला काळिमा फासणारी घटना अमरावतीतून समोर येत आहे. गावातील जागेच्या वादातून एका महिलेला ३ व्यक्तींनी मिळून जबर मारहाण केली आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. पीडित महिला काठीचा वापर करून स्वत:चा बचाव करत आहे. तर, इतर ३ पुरूष महिलेचे केस धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत आहेत. या प्रकरणी ४ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारदा बाभुळकर असे पीडित महिलेचं नाव आहे. ही संपूर्ण धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस स्टेशन हद्दीतील विर्शी गावात घडली. गावातील जागेच्या वादातून महिलेचा ३ पुरूषांसोबत बाचाबाची झाली. वाद टोकाला गेला आणि हाणामारीला सुरूवात झाली. महिलेला ३ पुरूषांनी मिळून मारहाण करायला सुरूवात केली.

महिला काठीनं मारहाण करत आहे. तर, इतर ३ जण महिलेचे केस धरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत आहेत. उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे. तसेच सोशल मीडियात व्हायरल केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तसेच तक्रार दाखल करून आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. या प्रकरणी पोलिसांनी वलगाव पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT