Shocking : गुप्तधनासाठी देणार होते नरबळी, पण... SaamTvNews
महाराष्ट्र

Shocking : गुप्तधनासाठी देणार होते नरबळी, पण...

नरबळी देण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन आरोपींसह एका महिला मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे.

लक्ष्मण सोळुंके

जालना : अनिष्ठ रूढी आणि अंधश्रद्धेचा पगडा ग्रामीण भागासह शहरी भागात पण अद्यापही कायम असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळत असते. अशीच एक धक्कादायक घटना जालन्यात समोर आली आहे. गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या तयारीत असलेल्या तीन जणांना जालन्यातील टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली आहे.

हे देखील पहा :

जाफ्राबाद तालुक्यातील डोनगाव येथे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन पुरुषांचा समावेश असून बुलडाण्यातील उंबरखेड येथुन एका महिला मांत्रिकाला देखील अटक करण्यात आली आहे. डोनगाव येथील एका महिलेने सदर आरोपी गावातील जुन्या वाड्यातील गुप्तधनाच्या शोधात असून गुप्तधनासाठी नरबळी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना दिली.

त्यानंतर पोलिसांनी वेगाने या प्रकरणाचा तपास करत तिन्हीही आरोपींना तातडीने अटक केली. या तिघा आरोपींवर पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : SIR चा फॉर्म भरल्यावर मिळणार १६ हजार रुपये? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

Coriander Storage: फ्रिजमध्ये कोथिंबीर लगेच काळी पडते? मग या ट्रिक्स वापरा 10 दिवस फ्रेश राहील

Maharashtra News Live Update: चंद्रपूर- मनपा आमसभेच्या कोरमवरून महापौर नगरसेवकांमध्ये आरोप प्रत्यारोप

श्रावण कधीपासून सुरु होणार? जाणून घ्या तारीख आणि धार्मिक महत्त्व

Health Care : सतत थकल्यासारखे वाटते का? ' ही' ५ गंभीर लक्षणे फॅटी लिव्हरची असू शकतात, वेळीच ओळखा

SCROLL FOR NEXT