Nagpur Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur Crime : नागपुरातून ७ महिन्यांत ९५८ महिला बेपत्ता; नेमकं कारण काय?

मुली आणि महिला बेपत्ता होण्याची वेगवेगळी कारणं समोर आली आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : बदलत्या काळाच्या ओघात देश प्रगतीपथावर असल्याचं सांगितलं जातं. यावर्षी देशाचा ७५ वा अमृत महोत्सवही साजरा केला जात आहे. मात्र, असं असलं तरी, आपली दुसरी बाजूही निखरणे तितकंच महत्वाचं आहे. विदर्भातील नागपूर जिल्ह्यातून गेल्या सात महिन्यांत तब्बल ९५८ महिला तसेच मुली बेपत्ता झाल्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूर पोलिसांनी ही माहिती दिली आहे. (Nagpur Crime News)

धक्कादायक बाब म्हणजे मुली आणि महिला बेपत्ता होण्याची वेगवेगळी कारणं समोर आली आहे. नागपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,जानेवारी ते जुलै महिन्यात नागपूरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये महिला बेपत्ता असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

बेपत्ता झालेल्या महिलांमध्ये २१ वर्षाखालील मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या सात महिन्याच्या कालावधीत तब्बल ३१२ तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. यामध्ये रागाच्या भरात घरातून निघून जाणाऱ्या तरुणींचं प्रमाण सर्वाधिक आहे. (Nagpur Todays News)

पतीसोबत भांडणातून महिलांनी सोडलं घर

संसाराचा गाडा हाकत असताना, भांड्याला भांडे हे लागणारच. अगदी छोट्या मोठ्या कारणाने दिवसेंदिवस पती-पत्नीमधील वाद विकोपाला पोहचत आहे. कारण क्षुल्लक पण निर्णय मोठा घेऊन संसार मोडल्याच्या अनेक घटना घडत आहे. त्यामुळे नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून किंवा सतत होणाऱ्या वादाला वैतागूनही महिलांनी घर सोडल्याचे प्रकार घडलेले आहेत. यानंतर समुपदेशन आणि सल्ल्याने पुन्हा संसार हे जुळलेले देखील आहेत.

प्रेमप्रकरणातून ठोकली धूम

आधुनिक तंत्रज्ञानाचा जगात समाजव्यवस्थेतही मोठे बदल पाहयला मिळत आहे. चूल आणि मूल ही गोष्ट बाजूला सावरून मुलींचा शिक्षणात तसेच नोकरीत अग्रेसर आहे. त्यामुळे प्रेम प्रकरणेही वाढली आहे. तरुण-तरुणींच्या प्रेमात जर कुटुंबियांचा अडसर होत असेल तर थेट पळून जाण्याचा मार्ग स्विकारला जात आहे. त्यामुळेच महिलांपाठोपाठ तरुण मुलीदेखील घर सोडून जात आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जेवताना घाई करण्याची सवय तुम्हाला आणू शकते मोठ्या संकटात; पोटाचे आरोग्य बिघडवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या सत्य

Plank Benefits: खरचं वजन कमी करायचं आहे? मग सुरुवात करा 'या' व्यायामाने, मिळेल पॉझिटिव्ह बदल

Parenting Alert : लहान मुलांच्या घशात काही अडकलं तर सर्वात आधी काय करावे? प्रत्येक पालकाला माहित असाव्यात 'या' २ महत्त्वाच्या गोष्टी

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT