Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडकींना सरकारकडून दणका, २६.३४ लाख महिला अपात्र; नेमकं कारण काय?

Maharashtra Government: लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना सरकारकडून मोठा धक्का बसला आहे. जवळपास २६.३४ लाख महिलांना अपात्र करण्यात आले आहे. या महिलांच्या खात्यात जूनचा हफ्ता जमा झाला नाही.

Priya More

Summary -

  • लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठी अपडेट दिली

  • २६.३४ लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवले

  • या महिलांना जूनचा हफ्ता मिळाला नाही

  • २.२५ कोटी महिलांच्या खात्यात हफ्ता जमा झाला

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्यामधील लाभार्थी महिला आणि अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर करण्यात आली आहे. जूनमध्ये किती महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आणि किती महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आले त्याची सरकारने आकडेवारी जारी केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील तब्बल २६.३४ लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे. त्यामुळे जूनचा हफ्ता ज्या लाडकींच्या खात्यावर जमा झाला नाही त्या नाराज झाल्या आहेत.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यामध्ये राज्यातील जवळपास २ कोटी २५ लाख लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले. तर जूनपासून २६ लाख ३४ हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यांना आतापासून या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत त्या नाराज झाल्या आहेत.

ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हफ्ता मिळाला नाही त्या मागचे कारण देखील समोर आले आहे. या लाडक्या बहिणी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्यामुळे, काही कुटुंबांमध्ये २ पेक्षा जास्त लाभार्थी असल्यामुळे, तर काही ठिकाणी पुरूषांनी अर्ज केल्याची प्रकरणं समोर आल्यामुळे या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सरकारकडून तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींबाबत काही दिवसांपूर्वी धक्कादायक माहिती समोर आली होती. सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं निदर्शनास आले होते. इन्कम टॅक्सकडील माहितीवरून अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अर्जांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. त्यामुळे हे सर्व बोगस लाभार्थी अपात्र ठरणार आहेत.

लाडकी बहीण योजनेत किती महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे?

जून महिन्यात राज्यातील २६.३४ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

महिलांना अपात्र ठरवण्यामागील मुख्य कारण काय आहे?

एकाच कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभार्थी असणे, एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेणे, तसेच काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्यामुळे त्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेचा जूनचा हफ्ता किती महिलांच्या खात्यात जमा झाला?

जवळपास २.२५ कोटी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT