Nagpur 10th Class Student End Life Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : नागपूर हादरलं! १० वीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Nagpur 10th Class Student End Life : नागपूरमध्ये दहावीच्या बोर्ड परीक्षेपूर्वी एका विद्यार्थिनीने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर मानसिक आरोग्य व विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक दबावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Alisha Khedekar

  • दहावीच्या बोर्ड परीक्षेपूर्वी नागपुरात विद्यार्थिनीची आत्महत्या

  • अभ्यास व परीक्षेच्या तणावाचा प्राथमिक अंदाज

  • घरात कोणी नसताना गळफास घेतल्याची माहिती

  • पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद व पुढील तपास सुरू

राज्य महामंडळाची सर्वात महत्त्वाची मानली जाणारी इयत्ता १०वी आणि १२ वीची परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी जोमाने सुरु असून परीक्षेसाठी सज्ज होत आहेत. अशातच नागपुरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभ्यासाच्या तणावातून एका दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. मृत मुलीचे नाव रुद्राईंनी दीपक शेलकरी असे आहे. या घटनेनंतर नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली असून मुलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन विद्यार्थिनी रुद्राईंनी दीपक शेलकरी (वय १६) ही नागपूरमधील विवेकानंद नगरमध्ये राहायची. ती नागपूर मधील वडधामना येथील कारमेल अकॅडमी शाळेतील इयत्ता १०वीच्या वर्गात शिकत होती. काल दुपारी घरी कोणी नसल्याची संधी साधून तिने गळफास घेत आयुष्याचा शेवट केला. हा प्रकार तिच्या लहान भावाच्या लक्षात येताच त्याने कुटुंबाला याबाबत कळवलं. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटक चाचणी आणि बोर्ड परीक्षेतील गुणांबाबत तणाव असल्याच्या कारणावरून या मुलीने आत्महत्या केली असल्याची प्राथमिक अंदाज आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून यापूर्वी देखील याच शाळेतील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे.

दरम्यान मृत मुलीवर शनिवारी दवलामेटी म्हाडा कॉलनीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाय वाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या आत्महत्येमागील ठोस कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत. विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर मानसिक आरोग्य व विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक दबावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Phone Battery Care: बॅटरी किती टक्के झाल्यावर चार्जिंगवरुन फोन काढायचा?

वाळू माफियांची दादागिरी! महिला तलाठ्याच्या अंगावर घातला ट्रॅक्टर | VIDEO

Snowfall : निसर्गाचा प्रकोप! भीषण बर्फवृष्टीमुळे ६१ जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत

Famous Singer Death: प्रसिद्ध गायक काळाच्या पडद्याआड; वयाच्या ५४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Maharashtra Live News Update: परिवहन मंत्र्यांच्या परळ डेपो पाहणीत एसटीचे चालक वाहक मद्यधुंद अवस्थेत

SCROLL FOR NEXT