धनंजय मुंडेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या, केज नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसचा धक्का! SaamTVNews
महाराष्ट्र

धनंजय मुंडेची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या, केज नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसचा धक्का!

कॉंग्रेस व भाजपा पुरस्कृत जनविकास आघाडी एकत्र !

विनोद जिरे

बीड : केज नगरपंचयात निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस व भाजपा पुरस्कृत जनविकास आघाडीने एकत्र येत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. धनंजय मुंडे (Dhananjay-Munde) यांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी चक्क काँग्रेसने (Congress) स्थानिक जनविकास आघाडीला पाठींबा दिला आहे.

हे देखील पहा :

या संदर्भात खासदार रजनीताई पाटील (Rajani Patil) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि जनविकास आघाडी केजच्या विकासासाठी एकत्र आली असून नगरपंचयातमध्ये सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे आदित्य पाटील व जनविकास आघाडीचे हारून इनामदार यांनी शिवनेरी बंगला येथे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घोषित केले. केज (Kej) नगरपंचयात निवडणुकीत जनविकास आघाडी 8, राष्ट्रवादी (NCP) 5, काँग्रेस 3 तर एक अपक्ष असे उमेदवार निवडून आले होते. परंतु यामध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तेचा पेच निर्माण झाला होता.

परंतु, यावर आता पडदा पडला असून केजच्या विकासासाठी काँग्रेसच्या खा.रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा (BJP) पुरस्कृत जनविकास आघाडी व काँग्रेस एकत्र आले असून सत्ता स्थापन करणार आहेत.आपलं गाव आपलं सरकार ही संकल्पना घेऊन आम्ही आता गावात विकास काम करू असेही यावेळी बोलताना उपस्थितांनी सांगितले. यावेळी अंकुशराव इंगळे, पशुपतीनाथ दांगट, प्रकाश भन्साळी, शकील इनामदार, दिलीप गुळभिले, हाजी मौला सौदागर यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाढत्या पेट्रोल दरांचा परिणाम? पेट्रोल चोरीच्या घटनांत वाढ

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' चे बॉक्स ऑफिसवर वादळ; रितेश देशमुखच्या ऐतिहासिक चित्रपटाची रविवारी बक्कळ कमाई, वाचा कलेक्शन

Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये चाललंय काय? ७० नगरसेवक अचानक संपर्काबाहेर, राज्यातील राजकारणात मोठी खळबळ

पुणे हादरले! बस स्टँडवर तरुणीसमोर माथेफिरूचे हस्तमैथुन; तरुणीने व्हिडिओ बनवला अन्...

PM Kisan Yojana: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता; तुमचे नाव तर नाही ना?

SCROLL FOR NEXT