Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीडमध्ये चाललंय काय? एका दिवसांत १३ वर्षांच्या मुलीचं दोनदा लग्न, पहिला नवरा ३५ वर्षांच्या तर दुसरा...

Beed Police: बीडमध्ये १३ वर्षांच्या मुलीचं एका दिवसांत दोनदा लग्न लावून देण्यात आलं. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

बीडमध्ये बालविवाहाची भयंकर घटना घडली. एका दिवसांत १३ वर्षांच्या मुलीचं दोन वेळा लग्न लावण्यात आलं. बीडच्या शिवाजीनगर भागात ही धक्कादायक घटना घडली. ही मुलगी पाचवीमध्ये शिकते. सामाजिक संस्थांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी हा बालविवाहाचा डाव उधळवून लावला. मुलीचं लग्न ज्या व्यक्तीसोबत लावून देण्यात आलं ती व्यक्ती ३० ते ३५ वर्षांची आहे. या व्यक्तीच्या बायकोला ही गोष्ट कळताच तिने याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर ही व्यक्ती पळून गेली. त्यानंतर या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून देण्यात आलं. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नानंतर या मुलीचा पहिला नवरा पळून गेला. तर दुसऱ्या नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या मुलीच्या बालविवाह प्रकरणात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात काझीसह तब्बल २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा सर्व प्रकार शाहूनगर परिसरात घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. फरार झालेल्या पहिल्या नवऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

बीडच्या शिवाजीनगर भागामध्ये राहणाऱ्या आणि पाचवीमध्ये शिकणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीचे दोन वेळा लग्न झाले. ही मुलगी सोमवारपासून सहावीच्या वर्गात जाण्यासाठी तयारी करत होती. पण त्यापूर्वीच तिच्या वडिलांनी आणि सावत्र आईने तिचे लग्न लावून दिले. या मुलीच्या आईने तिचे लग्न अगोदरच दोन लग्न झालेला आणि दोन मुलांचा बाप असलेल्या एका व्यक्तीशी लावून दिले. शाहूनगरमध्ये गुरूवारी घरातच हे लग्न पार पडलं. लग्नानंतर दोघांचे फोटोही काढण्यात आले होते.

या लग्नाबाबत त्या व्यक्तीच्या बायकोला कळाले तेव्हा तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस कारवाई करतील या भीतीने ही व्यक्ती पळून गेली. त्याने आपल्या बहिणीच्या गावामध्ये राहणाऱ्या एका मुलाचे या मुलीसोबत लग्न लावण्यास सांगितले. त्याप्रमाणे एका दिवसांत या मुलीचे दुसरं लग्न लावण्यात आलं आणि त्यांचे फोटोही काढण्यात आले. लग्न झाल्यानंतर हा मुलगा नवरी मुलीला घेऊन जात होता तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतलं. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे. याप्रकरणी २२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT