Raigad khopoli Mangesh Kalokhe Murder Case Saam Tv
महाराष्ट्र

Mangesh Kalokhe : २० लाख नाही तर १ कोटींची सुपारी दिली, मंगेश काळोखे हत्या प्रकरणात शिंदेंच्या आमदाराचा गंभीर आरोप

Raigad khopoli Mangesh Kalokhe Murder Case : शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे हत्या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. या हत्येसाठी १ कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला असून प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे.

Alisha Khedekar

  • मंगेश काळोखे हत्या प्रकरणाला एक महिना पूर्ण

  • १ कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप

  • आमदार महेंद्र थोरवे यांचे गंभीर आरोप

  • प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

सचिन कदम, रायगड

शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या घटनेला १ महिना उलटून गेला असून या हत्येसाठी एक कोटींची सुपारी दिली असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या बड्या आमदाराने केला आहे. त्यांच्या या आरोप प्रत्यारोपानंतर चर्चेला उधाण आले आहे.

खोपोलीत २६ डिसेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास मुलीला शाळेत सोडून घरी परतणाऱ्या मंगेश काळोखे यांच्यावर काळ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या पाच जणांनी हल्ला केला. त्यांच्यावर धारधार शस्त्र्याने २१ हून अधिक वार करण्यात आले. ज्यात शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या घटनेला एक महिना पूर्ण झाला असून ही हत्या करण्यासाठी २० लाख नव्हे तर, १ कोटी रुपयांची सुपारी प्लॅनर किलरला देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप शिंदे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे.

या हत्येत असणारे सगळे आरोपी हे कटकारस्थान करणारे मुख्य आरोपी रवींद्र देवकर यांच्या कार्यालयात लपून होते असा देखील त्यांनी आरोप केला आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये त्यांचे आणखी काही आरोपी साथीदार आहेत त्यांना सुध्दा अटक करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

काळोखे यांच्या शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबाचा देखील यामध्ये सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. तसेच घटनेपासून ही दोन्ही कुटुंब फरार असल्याने त्यांच्यावर देखील आमचा संशय असून पोलिसांनी त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. शिवाय मंगेश काळोखे यांची हत्या एकट्या रवींद्र देवकर यांनी केलेली नसून त्यांना पाठबळ देणाऱ्या व्यक्तींचा अद्याप शोध नाही अशी नाराजगी त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

Operation Tiger: 'महिनाभरापूर्वीच ओमराजेंच्या बंडाचं प्लॅनिंग', भावानेच केला मोठा गौप्यस्फोट

Mumbai Crime: मुंबई हादरली! धावत्या लोकलमध्ये तरुणाची हत्या, तो भोसकत राहिला मुंबईकर बघत राहिले

SCROLL FOR NEXT