Narayan Rane saam tv
महाराष्ट्र

Political News : गेलेले आमदार परतणार अन् नारायण राणेंचं मंत्रिपदही जाणार; ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये नारायण राणे यांचं मंत्रीपद जाणार असल्याचा दावा नाईक यांनी केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Vaibhav Naik vs Narayan Rane : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर सातत्याने ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांवर आरोप करत आहेत. अशात राणे आणि ठाकरे यांच्यातील वाद काही नवा नाही. या वादात आता आमदार वैभव नाईक यांनी देखील उडी घेतली आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये नारायण राणे यांचं मंत्रीपद जाणार असल्याचा दावा नाईक यांनी केला आहे. (Vaibhav Naik)

नारायण राणे यांचं मंत्रिपद दोन ते तीन महिन्यात जाणार हे भाकीत नसून वस्तुस्थिती आहे.असं देखील वैभव नाईक यांनी पुढे म्हटलं आहे. नारायण राणे यांचं शिवसेनेवर टीका करण्याचं काम होतं. ते काम आता संपलेलं आहे त्यामुळे त्यांचं मंत्रीपद पुढील काही महिन्यांमध्ये जाणार आहे, असा दावा वैभव नाईक यांनी केलाय.

माध्यमांशी संवाद साधताना वैभव नाईक पुढे म्हणाले की, नारायण राणेंना माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभं करायचं आहे. मात्र जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मी नाराज आहे, मी शिंदे गटात जाणार आहे असा संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा उद्योग सुरू आहे, असं देखील नाईक यांनी यावेळी म्हटलं.

अनेक आमदार परत येण्यास तयार

बंड केलेल्या आमदारांना लक्ष करत नाईक पुढे म्हणाले की, जे आमदार आमच्यातून निघून गेलेत ते आमदार आमच्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येण्यास तयार आहेत. आमच्यातून गेलेल्या आमदारांना आता त्यांची खरी परिस्थिती कळालेली आहे.

शिंदे गटाकडून ऑफर

शिंदे गटांकडून अनेक वेळा मला ऑफर देण्यात आलेली आहे. त्यांची मलिन झालेली प्रतिमा, उद्धव ठाकरेंचे सरकार पाडल्याबद्दल जनतेत रोष आहे. त्यामुळे हे आमदार परत यायला तयार आहेत,असं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापूरात मध्यरात्री रक्तरंजित थरार, तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

SSC Result 2026: दहावीचा निकाल २ टक्क्यांनी घसरला, पाहा मुंबई पुण्यासह ९ विभागाचा किती टक्के निकाल?

Raja Shivaji Box Office Collection: रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा धुमाकूळ, 7व्या दिवशीही कमावले तब्बल इतके कोटी

'Raja Shivaji' च नाही तर बॉलिवूडमधील 'या' चित्रपटांचे शुटिंग झालंय साताऱ्यात, पाहा ठिकाणाची यादी

SSC Result 2026 : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींनीच मारली बाजी; पाहा तुमच्या जिल्ह्याचा निकाल

SCROLL FOR NEXT