Aditya Thackeray Opposition Leader Saam Tv
महाराष्ट्र

Shivsena UBT: भास्कर जाधव यांना आमदारांचा विरोध; ठाकरेच हवे विरोधी पक्षनेते!

Aditya Thackeray Opposition Leader: ठाकरे गटातील अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते म्हणून भास्कर जाधव यांची नियुक्ती करू नये अशी आमदारांची मागणी आहे.

Bharat Jadhav

शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षातील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून भास्कर जाधव यांच्या निवड करण्यात येऊन नये अशी मागणी ठाकरे गटातील आमदारांनी केलीय. भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध होत असल्यानं विरोधी पक्षनेता म्हणून आदित्य ठाकरे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांनाच विरोधी पक्षनेते करावं असं ठाकरे गटातील काही आमदारांचे मत आहे.

मागील काही दिवसांपासून आमदार भास्कर जाधव यांनी पक्षविरोधी वक्तव्य केली होती. या विधानामुळेच त्यांना विरोध केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान ठाकरेंची शिवसेना लवकरच विरोधी पक्षनेते पदाचा दावा विधानसभा अध्यक्षांकडे करणार आहे. मातोश्री या निवासस्थानी ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पक्षाशी रणनीती आणि विरोधी पक्षनेते पदासंदर्भात चर्चा झाली, त्यात भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध करण्यात आला.

या बैठकीत काही आमदारांनी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात यावी अशी मागणी केली. त्यामुळेच आता आदित्य ठाकरे यांच्या रुपाने एक तरुण विरोधी पक्ष नेता राज्याला मिळू शकतो. तरुण विरोधी पक्षनेता मिळाल्यास त्याचा फायदा पक्षाला होऊ शकतो, असंही काही आमदार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT