Chandrakant Khaire, Ambadas Danve and Uddhav Thackeray SAAM TV
महाराष्ट्र

Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Shivsena UBT Candidate List : छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरू झालेल्या नाराजीच्या चर्चेला अंबादास दानवे यांनी पूर्णविराम दिला. मी नाराज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

साम टिव्ही ब्युरो

रामू ढाकणे | छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरू झालेल्या नाराजीच्या चर्चेला दानवे यांनी पूर्णविराम दिला. मी नाराज नाही. पक्षाचं हित मला कळलं, असं म्हणत अंबादास दानवे यांनी म्हटलं. (Lok Sabha Election 2024)

सर्वांची मते जाणून घेऊन ही यादी करण्यात आली आहे. ही प्रभावी यादी आहे. दिल्लीत जाण्याची ही यादी आहे. मी 2014, 2019 मध्ये इच्छुक होतो तशी आताही इच्छा होती. इच्छा असणे चूक नाही. मात्र माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची महत्वाची जबाबदारी दिली आहे. आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे. निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुखांचा आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचे हीत महत्वाचं आहे. पक्षप्रमुख आणि पक्ष जी जबाबदारी देतील ती सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. मी पक्षप्रमुखांना आता फोन करून बोललो, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. चिंता नसावी जोमाने पक्षाचं काम करू म्हटलं, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

भाजपकडून सत्तेचा गैरवापर

सत्ता आणि संपत्तीचा अतिरेकी वापर भाजप करत आहे. हा सत्तेचाच गैरवापर आहे. तुमच्या खात्यात सात हजार कोटींचे रोखे आले आहेत. हे ब्लॅकमेल करूनच आलेले आहेत, हे आव्हान आहे. मात्र हे आव्हान देखील आम्ही सहज पेलू, सत्ता संपत्तीचा बाजार देशात राज्यात भाजपने मांडलेला आहे, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं.

शिवसेना शिंदे गटाकडून दर चार-पाच दिवसांनी फोन

शिवसेना शिंदे गटाकडून दर चार-पाच दिवसांनी फोन येतात, मी नाकारत नाही. मात्र माझ्याकडून होकार नाही. सर्व माझे जुने सहकारी आहेत. त्यांनी इच्छ व्यक्त केली. त्यांना वाटत मी सोबत असावं. मात्र मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. मी गद्दारांविरोधात लढतोय आणि मी कशी गद्दारी करू, असंही अंबादास दानेव यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT