Dasara Melava 2023 Saam TV
महाराष्ट्र

Dasara Melava 2023 : तुमचा दसरा मेळावा भाजप कार्यालयात घ्या, वैभव नाईकांनी शिंदे गटाला डिवचलं

Political News : मोदी-शाहांचे मोठेपण गाणाऱ्यांना शिवसेनेचे विचार मांडण्याचा कुठलाही अधिकार नाही.

प्रविण वाकचौरे

विनायक वंजारे

Sindhudurg News :

मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्कवर यावर्षी देखील शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. शिंदे गटाने मैदानासंदर्भात महापालिकेकडे केलेला अर्ज आता मागे घेतला आहे. त्यामुळे  ठाकरे गटाचा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता दसरा मेळावा कुठे घ्यायचा, असा प्रश्न शिंदे गटासमोर आहे. त्यासाठी जागेचा शोधही शिंदे गटाने सुरु केला आहे.

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी टीकास्त्र सोडलं आहे. शिंदे गटाने दसरा मेळावा घेऊ नये. घ्यायचा असेलच तर तो भाजपच्या कार्यालयात घ्यावा, अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे.  (Latest Marathi News)

मोदी-शाहांचे मोठेपण गाणाऱ्यांना शिवसेनेचे विचार मांडण्याचा कुठलाही अधिकार नाही. ह्यांच्या हातात आता पक्षाची ध्येय, धोरणे राहिली नसून ती भाजपच्या हातात आहेत. शिंदे गटाची भूमिका भाजप ठरवणार आहे, अशा शब्दात वैभव नाईक यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला आहे.

शिंदे गटाने दसरा मेळावा घेण्यापेक्षा मोदींची सभा घ्या. भाजपमध्ये तुमचा पक्ष विलीन होणार आहे. शिवसेनेमध्ये अडथळे आणण्यासाठी शिंदे गटाचा वापर केला जातो आहे.

यांच्या मेळाव्याला गर्दी कशी होते, कोण उत्तर भारतीय होते, कोण बिहारी होते, कोण भाषण करताना लोक उठून गेले, हे सगळ्यांनी पाहिलं आहे. शिवतीर्थावर एकही रुपया न देता जी गर्दी होते, ती शिवसेनेच्या विचारांचं सोनं लुटायला येतात. मात्र तुमची गर्दी विचारांची नसते, असंही वैभव नाईक यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Summer Health Tips : कडाक्याच्या उन्हातून घरी आल्यावर या चूका टाळाच, अन्यथा....

Wardha : आयकर अधिकारी असल्याचं सांगितलं, सर्च वॉरंट दाखवलं; वर्ध्यात प्राध्यपकाच्या घरात चोरट्यांची घुसखोरी

Iran - Israel War: दुबईत अडकलेल्यांच्या मदतीला धावणार सोनू सूद; म्हणाला तुम्ही कुठेही असाल, 'मला मॅसेज करा...'

Dried Lipstick: जुनी-सुकलेली लिपस्टिक कचऱ्यात फेकताय? टाकून देण्यापूर्वी पाहा री-युज करण्याची स्मार्ट टीप्स

Rashmika-Vijay Reception Photo : लाल भरजरी साडी अन् पांढरा शुभ्र धोती-कुर्ता; रश्मिका-विजयचा रॉयल लूक पाहून चाहत्यांना याडं लागलं

SCROLL FOR NEXT