Deputy CM Eknath Shinde Saam tv
महाराष्ट्र

ZP Election: माझा नाद नाही करायचा, थांब तुझी एन्क्वायरीच लावतो..., शिंदेंच्या आमदाराकडून भरसभेत बंडखोर उमेदवाराला धमकी

Maharashtra Politics: जिल्हा परिषद निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने भरसभेत विरोधी उमेदवाराला भरसभेत दम दिल्याचा प्रकार घडला. थांब तुझी एन्क्वायरीच लावतो..., असे ते म्हणाले.

Priya More

Summary -

  • धाराशिवमध्ये निवडणूक सभेत तानाजी सावंत यांचे वादग्रस्त वक्तव्य

  • बंडखोर उमेदवाराला 'एन्क्वायरी लावतो' अशी धमकी दिली

  • या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • प्रकरणामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राज्यभर जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेतल्या जात आहेत. या सभांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी भरसभेत बंडखोर उमेदवाराला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. 'माझा नाद नाही करायचा, थांब तुझी एन्क्वायरीच लावतो...', असे म्हणत तानाजी सावंत यांनी विरोधी उमेदवाराला दम दिला. त्यांच्या या विधानाची आता चर्चा होऊ लगाली आहे.

तानाजी सावंत यांनी भरसभेत विरोधी उमेदवाराला धमकी देताना असं विधान केलं की, 'थांब, तुझ्यावर एन्क्वायरी लावतो.' तानाजी सावंत यांनी भरसभेत बंडखोर उमेदवाराला दम भरला याची आता जिल्ह्यात चर्चा होऊ लागली आहे. धाराशिव जिल्ह्यातील पारा जिल्हा परिषद गटात झालेल्या सभेत तानाजी सावंत यांनी विरोधी उमेदवारावर थेट निशाणा साधला. सभास्थळी येताना रस्त्यांच्या दुरावस्थेवरून संताप व्यक्त करत, जनतेला वेठीस धरू नका असा इशारा त्यांनी दिला.

आपलाच जुना कार्यकर्ता बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने तानाजी सावंत आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले.'महाराष्ट्र फिरवलेला हा तानाजी सावंत आहे, माझा नाद करायचा नाही.' असे म्हणत त्यांनी बंडखोर उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला. तानाजी सावंत यांनी विरोधी उमेदवाराला धमकी दिल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिव दौऱ्यावर आहेत. धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील जेवळी येथे जाहीर सभा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महानगरपालिकेच्या वेळेस राष्ट्रवादी बरोबर युती करणं हा चुकीचा निर्णय; सपकाळ

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT