cm and devendra fadnvis Saam Tv
महाराष्ट्र

Shivsena Vs BJP: २०२४ साठी भाजपचे मिशन कोकण; दोन माजी मंत्री, एक आमदार भाजपच्या संपर्कात

भाजपने २०२४ साठी मिशन कोकण सुरु केलं आहे. शिवसेनेचे दोन माजी मंत्री आणि एक विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुबंई: भाजपने (BJP) २०२४ साठी मिशन कोकण सुरु केलं आहे. शिवसेनेचे दोन माजी मंत्री आणि एक विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. याच बालेकिल्यावर आता भाजपने लक्ष केलं आहे. शिवसेनेत (Shivsena) नाराज असलेल्या नेत्यांच्या संपर्कात भाजप असल्याचे बोलले जात आहे.

भाजपने चार राज्याच्या विधानसभेत मोठा विजय मिळवल्यानंतर भाजपने आता महाराष्ट्रसाठी मिशन २०२४ सुरु केले आहे. नागपुरात सभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी मिशन २०२४ असल्याचे सांगितले होते. २०२४ च्या विधानसभा भाजप (BJP) स्वबळावर लढणार असल्याचे फडणवीस यांनी जाहीर केले होते.

त्यामुळे भाजप २०२४ ला स्वबळावर लढण्याची तयार करत असल्याचे बोलले जात आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. याच बालेकिल्ल्याला भाजप सुरुंग लावण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेत (Shivsena) सध्या कोकणातील काही नेते नाराज आहे. याचाच फायदा भाजप घेणार आहे. कोकणातील दोन माजी मंत्री आणि एक विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप आता स्वबळाचा नारा घेऊन २०२४ च्या विधानसभा निवडणुकांत उतरणार असल्याचे बोलले जाते आहे. या अगोदर मुंबई महानगर पालिका होणार आहेत यासाठी भाजप तयारी करत आहे. मुंबईत भाजपचे मेळावे सुरु झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Purandar Fort : पुण्याजवळील ऐतिहासिक पुरंदर किल्ला, 'या' गोष्टी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

महिनाभर रोज न चुकता करा योगा, शरीरात होतील आश्चर्यकारक 5 बदल

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT