Lock saam tv
महाराष्ट्र

Shivsena: शिवसैनिकांनी परतूर पालिका कार्यालयास ठाेकले टाळे

शिवसेनेच्या मागण्यांचे निवेदन स्विकारत मुख्याधिका-यांनी ताेडगा काढू असे आश्वासन आंदाेलकांना दिले.

लक्ष्मण सोळुंके

जालना : परतूर पालिकेच्या (partur muncipal council) वतीने आकारण्यात येत असलेल्या वाढीव घरपट्टी विरोधात शिवसेनेच्या (shivsena) वतीने आज आक्रमक भूमिका घेण्यात आली. वाढीव घरपट्टी आकारणीला विरोध दर्शवत आज सेनेने परतूर (partur) पालिकेच्या मुख्य कार्यालयास कुलूप (lock) ठोकले. (partur latest marathi news)

दरम्यान संतप्त शिवसैनिकांना पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या दालनात बोलावत त्यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेच्या मागण्यांचे निवेदन स्विकारत त्यावर ताेडगा काढू असे आश्वासन आंदाेलकांना दिले.

यावेळी शिवसैनिकांनी (shivsainik) जुन्याच पद्धतीने घरपट्टी आकारण्यात यावी. शहरातील मुल्यांकन करताना मालमत्ता धारकांची परवानगी न घेता परस्पर मोजमाप करून पालिकेने केलेल्या नोंदी तात्काळ रद्द कराव्यात अशा मागण्या मांडल्या. या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुन्हा शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा प्रशासनास देण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire : मुंबईत एकाच दिवशी दोन ठिकाणी आग; इमारतीमधील नागरिकांची पळापळ

Pan Masala: पान मसाल्याच्या पॅकेटवर होणार मोठा बदल, कंपन्यांना पॅकेजिंगबाबत सरकारचे निर्देश

Maharashtra Live News Update: पुण्यातील भोंदू बाबा आणि वेदिका पंढरपूरकर प्रकरणी मोठी अपडेट

Nashik Crime Bhushan Londhe: उत्तर प्रदेशातही 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला'; कुख्यात गुंडाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे सामना सुरू असतानाच भारतीय क्रिकेटपटूनं अचानक घेतला संन्यास, भावुक पोस्ट

SCROLL FOR NEXT