Sanjay Raut SAAM TV
महाराष्ट्र

Sanjay Raut Death Threat: मोठी बातमी! संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी; दिल्लीत AK47 ने उडवू...

Maharashtra Politics: संजय राऊत यांच्या मोबाईवर या धमकीचे मेसेज आले आहेत; या प्रकरणी पुण्यातून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sanajay Raut News: राज्याच्या राजकारणातून सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून ही धमकी आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

बिश्नोई गॅंगकडून धमकी?

याबाबत अधिक माहिती अशी की, खासदार संजय राऊत यांना लॅारेन्स बिश्नोई गॅंगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा मॅसेज खासदार संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला असल्याची माहिती मिळत आहे. हिंदू विरोधी असल्यामुळे मारून टाकू असा हा मॅसेज आहे. "दिल्लीत आल्यावर AK 47 ने उडवून टाकू. मुसेवाला टाईपमध्ये मारु. लॅारेन्स के और से मॅसेज है, सलमान और तू फिक्स तयारी करके रखना," अशी अश्लील शिवीगाळ करत हा मॅसेज करण्यात आला आहे..

दोघांना घेतले ताब्यात...

संजय राऊत यांना धमकीचे मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकरणात पुण्यातील दोघांना ताब्यात घेतल्याची माहितीही समोर आली आहे..

राऊतांनी केले होते गंभीर आरोप...

याआधी खासदार संजय राऊत यांनी माझ्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर थेट हे धमकीचे मेसेज आल्याने मोठी खळबळ माजली आहे. याआधी लॅारेन्स बिश्नोई गॅंगकडून बॉलिवूड अभिनेता सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर सलमान खानच्या (Salman Khan) सुरक्षेत मोठी वाढही करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई, ठाण्यासाठी पुढील ७ तास अत्यंत महत्वाचे, मुसळधार पावसाची शक्यता | VIDEO

WhatsAppच्या मदतीने व्हाल मालामाल, कमाई करण्याचा मार्ग घ्या जाणून

Maharashtra Rain Live News : यवतमाळमध्ये खड्ड्यात बुडून ४ मुलांचा मृत्यू

Cooperative Society Elections: सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सहकार विभागाचा मोठा निर्णय

Police Recruitment: आनंदाची बातमी! १५,६३१ पदांच्या पोलिस भरतीचा शासन निर्णय जारी, परीक्षा शुल्क किती?

SCROLL FOR NEXT