Shahajibapu Patil vs Sanjay Raut Saam Tv
महाराष्ट्र

मी सांगोल्याचा माजलेला रेडा, शिंगाट घातलं तर..., आमदार शहाजीबापूंचा राऊतांना इशारा

शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना धमकीवजा इशारा दिला

साम टिव्ही ब्युरो

सोलापूर : सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी जाहीर सभेतून शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली. शहाजी बापू सांगोल्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी आपण सांगोल्याचा माजलेला रेडा असून खाली शिंगाट घातलं तर तुला असाच उभा करेल. अशा शब्दात शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना धमकीवजा इशारा दिला आहे. (Shahajibapu Patil vs Sanjay Raut)

शहाजीबापू हे शिवसेनेतून बंड पुकारून शिंदे गटात सामील झाले. बंडखोरी केल्यानंतर अखेर 15 दिवसांनी शहाजीबापू पाटील हे आपल्या मतदारसंघात परतले. सांगोल्यात गेल्यानंतर त्यांनी जाहीर सभेतून संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.

शहाजीबापू यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “संजय राऊत… मी सांगोल्याचा माजलेला रेडा आहे, एक शिंगाट खाली घातलं तर तुला असाच उभा करेन, आमच्या नादाला लागू नको.” यावेळी त्यांनी भरसभेत संजय राऊतांची नक्कल देखील केली आहे.

'संजय राऊत यांचं मनगट हे अंगठ्याएवढं आहे, आणि ते कापून काढू, प्रेतं आणू अशा धमक्या देतात. तुझं तुलाच चालता येईना, सकाळी बशीभर पोहे खातो, सायंकाळी चपाती खाऊन झोपते. ये आमच्याकडे बोकड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची असते, शिकवतो. त्यानंतर अंगात रग येते. मनगटात ताकद येते. ज्यांच्या मनगटात ताकद असते, त्यांनीच बोलावं'. असंही शहाजी बापू म्हणाले.

पुढे बोलताना आमदार शहाजी बापू म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंमुळे संधी मिळाली आहे, म्हणून संजय राऊतांनी याचा गैरफायदा घेऊ नये. त्यांनी तातडीनं बोलणं बंद करावं, तरच उरलं-सुरलं ठाकरे घराणं राहीन, नाहीतर ठाकरे घराण्याला संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी उचलली आहे', असा आरोपही शहाजी बापू यांनी केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT