Sanjay Rathod Yavatmal, Latest News Update, Marathi News Update, Political News Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Rathod | मातोश्रीचे दार पुन्हा उघडले, तर मी पुन्हा जाईल : संजय राठोड

बंडखोरी करण्याची वेळ संजय राऊतांमुळेच आली असं संजय राठोड म्हणाले.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं आहे. या दोघांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभेत बहुमत देखील सिद्ध करून दाखवलं. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराला वेळ असल्याने बंडखोर आमदार स्वत:च्या मतदार संघात पोहचले आहे. दिग्रज दारवा मतदारसंघातील बंडखोर आमदार संजय राठोडही (Sanjay Rathod) त्यांच्या मतदारसंघात पोहचले आहे. (Sanjay Rathod Political News)

शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड हे यवतमाळ येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच बंडखोरी का केली? याचं कारणही राठोड यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. संजय राऊत यांच्यामुळेच ही वेळ असल्याचा आरोप आमदार राठोड यांनी केला. तसेच मातोश्रीचे दारं पुन्हा आमच्यासाठी उघडल्यास मी पुन्हा जाईल असंही संजय राठोड यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले संजय राठोड?

आमची भूमिका हिंदुत्ववादीच आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्हाला आशा आहेत की, मातोश्रीचे दारं आज नाही तर 6 महिन्यानंतर आमच्यासाठी उघडतील. त्यावेळी आम्ही मातोश्रीवर नक्की जाऊ. संजय राऊत यांच्यामुळेच आमच्यावर बंडखोरची वेळ आली. असंही संजय राठोड यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

शिंदेंच्या गटातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये मंत्रिपदं कशी दिली जातील आणि भाजपाकडे कोणती मंत्रिपदं राहतील? यावर तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री होते. त्यावेळी एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव आले होते. यावेळी भाजपने आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडी सरकावर टीका केली होती. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोड यांचा राजीनामा घेतला होता. (Marathi News Update)

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : राज ठाकरे-उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT