Bharat Gogawale0 CM Shinde 
महाराष्ट्र

Bharat Gogawale on CM Shinde : एकनाथ शिंदे साहेब एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री नाहीत, भरत गोगावलेंच्या वक्तव्याची चर्चा

Political News : रायगडचे आमदार भरत गोगावले यांनी केलेलं वक्तव्य आता चर्चेत आलं आहेत.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Raigad News : एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंडखोरी करत भाजपसोबत जात मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी खांद्यावर घेतली. यावेळी एकनाथ शिंदे  यांना शिवसेनेच्या ४० आमदारांची साथ मिळाली. मात्र सत्तेत वाटा मिळला त्यावेळी शिवसेनेचे काही आमदार मंत्रिपदापासून दूर राहिले आहेत. यातूनच आता आमादारांची नाराजी समोर येताना दिसत आहे. रायगडचे आमदार भरत गोगावले यांनी केलेलं वक्तव्य आता चर्चेत आलं आहेत.

 भरत गोगावले  यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे साहेब आज मुख्यमंत्री आहेत ते एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री नाहीत. सगळे आम्ही ४० शिलेदार यांच्यामुळे ते मुख्यमंत्री आहेत. अलिबागमधील पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.

बच्चू कडूंची प्रतिक्रिया

भरत गोगावले यांच्या वक्तव्यावर बोलताना प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं की, प्रत्येकाने त्याग केले आहे. शिंदे साहेबांच्या संदर्भात सगळ्यांच्या चांगल्या भूमिका होत्या. भरत गोगावले मागे राहिले म्हणून त्यांना मंत्रिपद मिळाले नाही.

मंत्रिपद न मिळाल्याचा किस्साही सांगितला

यावेळी त्यांनी त्यांच्या हुकलेल्या मंत्रिपदाचाही किस्सा सांगितला. मंत्रिमंडळ विस्तारात माझाच नंबर होता परंतु मी थांबलो. एकाने सांगितले की माझी बायको आत्महत्या करेल, दुसऱ्याने सांगितले नारायण राणे मला जगू देणार नाही.

तिसरा म्हणाला मला मंत्रिपद मिळाले नाही तर मी राजीनामा देतो. मी एकाला फोन केला अरे तुमच्या संभाजीनगरमध्ये पाचपैकी दोघांना दिली तुला काय घाई आहे, असे सांगून त्याला थांबवले. आम्ही थांबलो ते अजूनपर्यंत थांबलो, असं गोगावले यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT