Rajesh Tope News Updates, Rajesh Tope on Shivsena Leaders  Saam TV
महाराष्ट्र

शिवसेना मंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास; राजेश टोपेंचा गंभीर आरोप

शिवसेना मंत्र्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होत असल्याच्या गोष्टी खऱ्या आहेत, असं म्हणत टोपे यांनी शिवसेना मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

लक्ष्मण सोळुंके

औरंगाबाद : राज्यात सत्ताधारी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षांचं सरकार असून सातत्याने या ना त्या कारणावरुन या तीन पक्षांतर्गत सतत वाद होताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वी काँग्रेस (Congress) आमदार आपणाला योग्य प्रमाणात निधी वाटप होत नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. तर शिवसेनेचे (Shivsena) काही नेते गृहमंत्रालयावर नाराज असल्याच्या देखील चर्चा जोरदार सुरु होती. अशातच आता खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी शिवसेना मंत्र्यांवर नाराजी दर्शवली आहे. (Rajesh Tope News Updates)

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) फोडाफोडी करत असल्याचा आरोप राजेश टोपे यांनी केला आहे. शिवसेना मंत्र्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होत असल्याच्या गोष्टी खऱ्या आहेत असं म्हणत टोपे यांनी शिवसेना मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. टोपे आणि सत्तार यांना सांगणार राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांची सत्तेच्या बळावर फोडफोडी करू नये. आपण महाविकास आघाडी धर्म पाळावा असं म्हणत मंत्री टोपेंने महाविकास आघाडी मधील खदखद व्यक्त केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणराया पावला! सोन्याच्या दरात मोठी घसरण, आज खरेदीची सुवर्णसंधी; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Badishep : जेवणानंतर बडीशेप खाताय? ५ गंभीर दुष्परिणाम वाचून आजपासूनच खाणे बंद कराल

Bigg Boss 20: 'माझ्या संस्कारांवर बोलू नको नाहीतर...'; 'बिग बॉस 20'च्या घरात पहिल्याच आठवड्यात वादाची ठिणगी; VIDEO चर्चेत

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रासह 10 राज्यांत DA वाढला, 'या' राज्यात एरियरही मंजूर

Maharashtra News Live Update: पुण्यामध्ये ७०१ सराईतांना गणेशोत्सवात 'नो एंट्री'

SCROLL FOR NEXT