Maharashtra Political Crisis Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra political crisis: महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले 'हे' आदेश

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेचा महाराष्ट्रातील बालेकील्ला ढासळला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांसह बंडखोरी केल्याने शिवसेनेचा महाराष्ट्रातील बालेकील्ला ढासळला. शिंदे गट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांच्यात जोरदार संघर्ष सुरु असून तमाम शिवसैनिक बंडखोर आमदारांच्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले असून तळागळातील शिवसैनिकांना निर्देश देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस प्रमुखांनी (Maharashtra Police) राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना 'हाय अलर्ट' राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेषत:मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गोंधळ घालू शकतात. त्यामुळे राज्यातील पोलिसांना सतर्क राहण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. तसेच बंड केलेल्या आमदारांच्या घरी व कार्यालयाबाहेर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून बंडखोर आमदार एकनाथ शिंदे गटाने राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातल्याने शिवसैनिकांनी मोर्चा काढण्याचा पवित्रा घेतला. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांना गद्दार बंडखोरांना सोडणार नाही, असा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तसेच एकनाथ शिंदे समर्थकांनी लावलेले बॅनरही फाडण्यात आल्याने शिंदे गट आणि शिवसेनेचा संघर्ष आणखीनच पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

राज्यात बोगस बियाणं विक्रीचं रॅकेट, विदर्भात बोगस बियाण्यांचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT