Shahaji Bapu Patil Saam TV
महाराष्ट्र

Shahaji Bapu Patil News: 'राऊतांचे आडनाव बदलून आगलावे करा.. ‘त्या’ आरोपांवरून शहाजीबापू पाटलांचा हल्लाबोल

Shahaji Bapu Patil On Sanjay Raut: संजय राऊत हे मातोश्रीशी कधीच एकनिष्ठ आहेत, असं मला वाटलं नाही. त्यांनी मातोश्रीचं राजकारण उद्ध्वस्त करण्याचीच सुपारी उचलली आहे, असेही ते यावेळी म्हणाले...

Gangappa Pujari

Pandharpur: शिवसेना पक्ष (Shivsena) आणि चिन्हाचा निकाल दिल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत यांनी जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली होती.

या आरोपानंतर शिंदे गटाच्या नेत्यांकडून संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका झाली होती. याच पार्श्वभूमीवर आमदार शहाजी बापू पाटील यांनीही संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. (Maharashtra Political News)

काय म्हणाले शहाजी बापू पाटील...

शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) म्हणाले, “खरं तर, या संजय राऊतांचं आडनाव बदलून नामकरण करून संजय आगलावे असं त्यांचं नाव ठेवायला हवं. ते महाराष्ट्रभर आग लावत फिरत आहेत. एक निष्पाप, प्रामाणिकपणे चांगलं काम करणारं तरुण तडफदार नेतृत्व श्रीकांत शिंदेंचं आहे. अशा तरुण नेतृत्वावर असे घाणेरडे आरोप करणं संजय राऊतांनाच काय, कुणालाच शोभत नाहीत. पण बेभान झालेले संजय रऊत सध्या कुणाविषयी काय बोलतील, याचा काही नेम राहिलेला नाही.”

शिवसेना नेते रामदास कदम यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना शिवीगाळ केल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना शहाजी बापू पाटील यांनी “संजय राऊत हे मातोश्रीशी कधीच एकनिष्ठ आहेत, असं मला वाटलं नाही. त्यांनी मातोश्रीचं राजकारण उद्ध्वस्त करण्याचीच सुपारी उचलली आहे. तसेच रामदास कदम यांच्याकडे निश्चित पुरावे असल्याशिवाय असा आरोप ते करणार नाहीत. ते एक जबाबदार नेते आहेत.” असे वक्तव्य केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पक्ष बदलणाऱ्यांना बसणार दणका; 'आयाराम गयाराम नेत्यांना होणार शिक्षा, सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Blood cancer symptoms: शरीरात हे बदल दिसले तर असू शकतो रक्ताचा कॅन्सर; लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Petrol Disel Rate: पेट्रोल ७ रुपये तर डिझेल २५ रुपयांनी महागलं; या कंपनीने घेतला मोठा निर्णय

Maharashtra Live News Update : पुणे शहरासह जिल्ह्याला आजही यलो अलर्ट

Madhuri Dixit: धकधक गर्लचा जलवा; माधुरी दीक्षितने नेसली 1,65,200 रुपयांची साडी

SCROLL FOR NEXT