Sanjay raut  saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: पुन्हा राजकारण तापणार! संजय राऊतांची जिभ घसरली, भाजपा नेत्यांना म्हणाले; 'हा अपमान सहन करणारे सर्व....'

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर संताप व्यक्त करताना अपशब्द वापरले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Gangappa Pujari

Sanjay Raut: सध्या राज्यात महापुरुषांबाबत केल्या गेलेल्या वादग्रस्त विधानांनी राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी महापुरूषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. ज्यामुळे विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली होती. आता पुन्हा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा दावा अमोल मिटकरींंनी केला आहे. याबद्दलचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे.

यामुळेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त करताना अपशब्द वापरले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी शेअर केला होता. यावरुन संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आम्ही सगळे याच मुद्द्यावर लढत आहोत, मात्र सत्तेत बसलेले नेते फेविकॉल लावल्यासारखे गप्प बसले आहेत. मला असं वाटत की केंद्रातील एखादा तरी मंत्री राजीनामा देवून महाराष्ट्रात येईल, मात्र असे होत नाही. जे हा अपमान सहन करत आहेत ते सर्व XXXची अवलाद आहेत," असा घणाणात राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वापरलेल्या या अपशब्दामुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या शिवरायांच्या अपमानामुळेही पुन्हा एकदा ते वादात सापडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP Number Plate: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची डेडलाइन वाढली; रजिस्ट्रेशन कसं कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

नवऱ्याची क्रूरता... बेदम मारहाण करत बायकोच्या गुप्तांगामध्ये घातले 10 इंच ब्लेड

Saturn transit: त्रिग्रही योगात शनीचं गोचर; पुढचे 6 महिने 3 राशी कमावणार बक्कळ पैसा

Paneer Tikka Masala Recipe: घरी अचानक पाहुणे आलेत? जेवणासाठी टेस्टी करायचं आहे? मग झटपट बनवा पनीर टिक्का मसाला

Maharashtra News Live Update: पिंपरी-चिंचवडमध्ये आज अचानक इंधनाचा तुटवडा, जवळपास 80% पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT