Sanjay Raut News Saam TV
महाराष्ट्र

मतं मागायची असतील तर आपल्या बापाच्या नावावर मागा, बाळासाहेबांचं नाव वापरु नका - संजय राऊत

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर तोफ डागली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंडोखोरी करुन जवळपास ५० समर्थक आमदारांसह शिंदे गट स्थापन केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह शिवसेना (shivsena) मोठा धक्का बसला आहे. शिंदे गट आणि शिवसेनेत संघर्ष पेटला असून शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाले असून बंडखोरांविरोधात घोषणाबाजी करत आहेत. शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सेनाभवनात नुकतीच पार पडली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी एकनाथ शिंदे गटावर तोफ डागली आहे. तं मागायची असतील तर आपल्या बापाच्या नावावर मागा, बाळासाहेबांचं नाव वापरु नका, असा सज्जड इशारा राऊत यांनी एकनाथ शिंदे गटाला दिला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांचं नाव इतर कोणत्याही राजकीय पक्षाला देता येणार नाही. शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि राहणार. शिवसेना बाळासाहेबांचे विचार घेवून महाराष्ट्रात पुढे जाईल. बाळासाहेब ठाकरे यांचा नाव कुणालाही लावता येणार नाही. ज्यांनी बेईमानी केली ते कोणत्याही पदावर असो, त्यांच्यावर कारवाई करण्याचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत.

आगामी निवडणुका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढू. कुठलाही गद्दार बाळासाहेबांच नाव वापरु शकत नाही.बंडखोर आमदारांवर लवकरच कारवाई केली जाईल. मतं मागायची असतील तर आपल्या बापाच्या नावावर मागा, शिवसेनेच्या बापाचं नाव लावू नका, असा इशारा राऊत यांनी शिंदे यांना दिला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंधेरीत तक्रारींची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या टोळीला अटक

Earthquake : पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के; ५.२ तीव्रतेच्या हादऱ्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; इंडोनेशिया हादरलं

Famous Director Death: ज्येष्ठ प्रयोगशील दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला संपवलं, भरचौकात ४ गोळ्या झाडल्या; थरारक VIDEO समोर

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT