Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'परंपरा आम्हाला शिकवू नका...' CM शिंदेंच्या वक्तव्यावर राऊतांचा हल्लाबोल; पोट निवडणुकीबाबत केला मोठा खुलासा

एकनाथ शिंदे यांनी राज्यात एखाद्या आमदाराच्या मृत्यूनंतर त्याजागी होणारी पोटनिवडणूक ही बिनविरोध होते अशी संस्कृती आहे, असे आवाहन केले होते.

Gangappa Pujari

Mumbai: कसबा मतदार संघाच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर या दोन्ही जागांवर पोट निवडणूका होणार आहेत. याबद्दल महाविकास आघाडी उमेदवार देणार का यासंबंधीचा महत्वाचा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच 26 फेब्रुवारी रोजी कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. चिंचवड मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेने लढवावी, अशी आमची इच्छा असल्याचेही ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्ट केले आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, कसबा आणि चिंचवड मतदार संघाची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत सर्वच पक्षांकडून दिले जात आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मात्र ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. यावर संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे.

याबद्दल बोलताना ते म्हणाले की, "पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी अजित पवार, जयंत पाटील आणि सुनील तटकरे काल रात्री मातोश्रीवर आले होते. त्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा केली. महाविकास आघाडीने ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास चिंचवडची जागा शिवसेनेने लढावी,"असे आमचे मत आहे

त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी राज्यात एखाद्या आमदाराच्या मृत्यूनंतर त्याजागी होणारी पोटनिवडणूक ही बिनविरोध होते अशी संस्कृती आहे, असे आवाहन केले होते. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याबद्दल बोलताना "महाराष्ट्राची संस्कृती काय आहे. त्याची कशी रोज पायमल्ली होतेय हे कोणी सांगायला नको. पंढरपूर आणि नांदेड पोटनिवडणुकीत ही संस्कृती दिसली नाही. पुढे संजय राऊत म्हणाले, केवळ अंधेरीची निवडणूक एकप्रकारे बिनविरोध झाली असे म्हणता येईल," अशा शब्दात एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Panvel : उंच कडे अन् कातळ पायऱ्या; पनवेलजवळ वसलाय 'हा' भव्य किल्ला, प्रत्येक पावलावर अनुभवाल थरार

Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका, 'या' शहरात ११२ रुपयांना पेट्रोलची विक्री; तुमच्या शहरातील दर किती?

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी प्रश्न पुरवण्याचा बदल्यात हवालदार यांनी रोख रक्कम स्वीकारल्याचं सीबीआय तपासात स्पष्ट

Crime News: खोलीत बोलवून जबरदस्तीने किस, नंतर प्राइव्हेट पार्टला...; बॉक्सिंग कोचचं अल्पवयीन तरुणीसोबत विकृत कृत्य

कॉकरोच जनता पार्टीच्या संस्थापकाला जीवे मारण्याची धमकी; घराबाहेर कडक पोलीस बंदोबस्त, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT