Deepali Sayyed Saam Tv
महाराष्ट्र

...म्हणून नरेंद्र मोदींनी माफी मागावी; दिपाली सय्यद यांचा भाजपवर हल्लाबोल

शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी आज भाजपवर टीका केली.

साम टिव्ही ब्युरो

शिर्डी: भाजपच्या (BJP) निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे भाजपवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता शिवसेनेच्या दिपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनीही यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आज दिपाली सय्यद शिर्डी दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी शिर्डीमध्ये साई समाधीचे दर्शन घेतले.

यावेळी बोलताना दिपाली सय्यद ((Deepali Sayyed) यांनी भाजपवर टीका केली. 'मै भारत का नाम झुकने नहीं दुंगा' असे म्हणणारे आता कुठं आहेत? भाजपच्या प्रवक्त्या प्रसारमाध्यमांमध्ये येऊन काहीही बोलतात, प्रत्येक धर्माचा आदर करून सांभाळून बोललं पाहिजे. प्रवक्ते असले म्हणजे तुम्ही काहीही बोलू शकत नाही. भारत देशाला तुम्ही झुकवले आहे, त्यामुळे मोटा भाईंनी माफी मागितली पाहिजे, असंही दिपाली सय्यद म्हणाल्या.

दिपाली सय्यद (Deepali Sayyed) यांच्याविरोधात नाशिकमध्ये तक्रार दाखल केली आहे. यावर बोलताना सय्यद म्हणाल्या, माझ्या विरोधात तक्रार होऊ शकत नाही. मी जे बोलले ते केवळ भाजप नेत्यांना प्रतिउत्तर होते. किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील, उमा खापरे यांनी जी वक्तव्य केली, त्याला मी उत्तर दिले आहे.

जसे भाजप नेत्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र (Pm Narendra Modi) मोदी मोठे आहेत. तसेच आमच्यासाठी देखील ते सन्माननीय आहेत. उलट उमा खापरेंनी मला जीवे मारण्याची भाषा वापरली. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यांना केवळ बेताल वक्तव्य केल्यानेच उमेदवारी मिळाली असल्याचा आरोप सय्यद यांनी केला. यावेळी त्यांनी विधान परिषद उमेदवारीसाठी उमा खापरेंचे अभिनंदन देखील केले.

विधान परिषदेच्या उमेदवारीवर बोलताना सय्यद म्हणाल्या, मी शिवसेनेची नेता आहे, मला माझ्या कामाचे फळ मिळणार आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सक्षम आहेत. मात्र देश आज कोणत्या स्थितीकडे चालला आहे, यावर देखील चर्चा महत्त्वाची आहे. मै देश नहीं झुकने दुंगा असे म्हणणारे पंतप्रधान कुठे गेले आहेत, असा सवालही दिपाली सय्यद यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाद की नाबाद? अंपायरनं दिलं आऊट, गुजरातचं फुल सेलिब्रेशन; तरी मैदान सोडेना कोहली; कॅचवरून उडाला गोंधळ

LPG Cylinder Price: सकाळ सकाळी महागाईचा झटका, 'हा' गॅस सिलिंडर महागला; वाचा तुमच्या शहरातील ताजे दर

Heart Attack Recovery: हार्ट अटॅकनंतर कोणता व्यायाम सुरक्षित? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला...

Today Horoscope : आज 'या' ३ राशींना होणार फायदाच फायदा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे खास?

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

SCROLL FOR NEXT