Tanaji Sawant Car Accident Saam Tv
महाराष्ट्र

Tanaji Sawant Car Accident: आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कारचा भीषण अपघात

Tanaji Sawant News: एक मोठी बातमी समोर येत आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

Tanaji Sawant Car Accident:

एक मोठी बातमी समोर येत आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. दोन गाड्या एकमेकाला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

तानाजी सावंत हे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी महालक्ष्मीचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते ज्योतिबाच्या दर्शनाला जात असताना पन्हाळा मार्गावर राजपूत वाडी हा अपघात झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तानाजी सावंत यांच्या ताफ्यात सात ते आठ गाड्या होत्या, अशी माहिती मिळाली आहे. मात्र अचानक पुढील गाड्यांचा वेग कमी झाल्यामुळे एकावर एक गाडी आदळली आहे. यातच दोन वाहन एकमेकांसमोर आल्याने हा अपघात झाला आहे. (Latest Marathi News)

या अपघातात तानाजी सावंत यांचे सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तानाजी सावंत हे ताफ्यातील दोन नंबरच्या गाडीत होते. हा हा अपघात त्यांच्या ताफ्यातील तीन आणि चार नंबरच्या गाडीमध्ये झाला आहे. अपघातानंतर त्यांचा ताफा आता कोल्हापूरच्या दिशेने पुढे आला आहे. इथं ते नियोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

SCROLL FOR NEXT