eknath shinde news  saam tv
महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार दौऱ्यावर; असा असेल संपूर्ण दौरा

नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून सकाळी 11 वाजता नंदुरबार (Nandurbar) नगर परिषदेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे.

तब्बल 22 कोटी रुपये खर्च करून नंदुरबार नगर परिषदेची भव्य इमारत तयार करण्यात आली आहे. नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्रिमंडळातील जवळपास सात मंत्री व 14 आजी माजी खासदार आमदार यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

नंदुरबार शहर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सजले असून सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे सत्कार समारंभ पार पडणार आहे.

त्यानंतर दुपारी दीड वाजता नंदुरबार शहरातील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची जाहीर सभा होणार आहे. या सभेला जवळपास 20 हजार नागरिक उपस्थित राहण्याची सोय करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यानिमित्त नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री व पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन सज्ज झालं असून सुरक्षेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे.

असा असेल संपूर्ण दौरा

सकाळी 10.40 वाजता पोलीस कवायत मैदान, नंदुरबार हॅलीपॅड येथे आगमन.

सकाळी 11.00 वाजता नंदुरबार नगर परिषद नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन.

सकाळी 11.20 श्री.छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराकडे प्रयाण.

11.30 वाजता सत्कार, मानपत्र व मान्यवरांचे मनोगत समारंभ कार्यक्रमास उपस्थिती.

दुपारी 12.15 वाजता माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या फार्म हाऊसकडे प्रयाण.

दुपारी 1.15 वाजता गजमल तुळशिराम पाटील मैदानाकडे मोटारीने प्रयाण.

दुपारी 1.30 वाजता जाहीर सभेस उपस्थिती.

दुपारी 3-00 वाजता महाविद्यालय मैदान येथूनल मोटारीने पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण.

दुपारी 3.15 वाजता पोलीस कवायत मैदान येथे आगमन व तेथून हेलिकॉप्टरने धुळेकडे प्रयाण.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT