aditya thackeray and eknath shinde Saam TV
महाराष्ट्र

Aditya Thackeray News: आदित्य ठाकरेंची आज तोफ धडाडणार; मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणार की टीका करणार?

युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Aditya Thackeray In Aurangabad : आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेच्या सातव्या टप्प्याचा आजचा चौथा दिवस आहे. युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे आज औरंगाबाद येथे ठिकठिकाणी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे दौऱ्यावर असल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत आहात.

त्यामुळे आज आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय नवीन आव्हान देणार याकडे लक्ष लागले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कशाप्रकारे शुभेच्छा देतात हे पाहणं महत्वाचं असेल.

आदित्य ठाकरे यांची औरंगाबादच्या (Aurangabad) बिडकीन गावात सभा होणार आहे. औरंगाबाद पैठण रस्त्यावर असलेल्या या गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही सभा पार पडणार आहे.

विशेष म्हणजे पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांनी ज्या गावात रॅली काढली होती, त्याच ठिकाणी काही दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील रॅली निघाली होती. त्यामुळे या गावाची मोठी चर्चा झाली होती.

आदित्य ठाकरे यांच्या महालगावातील कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहून पोलीस सुरक्षेत कसूर झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या होणाऱ्या सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी यापुढे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देण्यात येत आहे. तर आज बिडकीन गावात होणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी देखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Decoration Ideas: फुलांच्या माळा आणि रंगीत लाइट्सने दिवाळीनिमित्त करा घराची सजावट, कमीत कमी पैशांत होईल झगमगाट

Devendra Fadnavis: शाळा व कॉलेज विद्यार्थ्यांची फी माफ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही|VIDEO

Maharashtra Live News Update : ४५ लाख शेतकऱ्यांना विमा उतरवला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Hair Loss In Females: महिलांमध्ये वाढत्या केसगळतीमागचं खरं कारण उघड! ‘या’ 6 गोष्टींची कमतरता ठरते धोकादायक

८०च्या दशकात रॉयल एनफील्ड बुलेटची किंमत किती होती? जुनं बिल सोशल मीडियात व्हायरल

SCROLL FOR NEXT