vinayak mete, beed , shhivsangram, vinayak mete accident case saam tv
महाराष्ट्र

Vinayak Mete Accident Case : विनायक मेटेंच्या अस्थी विसर्जनानंतर शिवसंग्राम आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडं केली 'ही' मागणी

विनायक मेटे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आजही त्यांच्या तुकाई निवासस्थानी कार्यकर्ते, नागरिक, नेते मंडळींची रिघ लागली आहे.

विनोद जिरे

Shivsangram : विनायक मेटे साहेब हे आमचं दैवत. त्यांच्याबाबतीत जे घडलं ते आमच्या विचार करण्याच्या पलीकडचं आहे. परंतु त्यांच्या अपघाताची चाैकशी हाेऊन लवकरात लवकर सत्य बाहेर यावे इतकीच अपेक्षा आहे अन्यथा शिवसंग्राम महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरले असा इशारा शिवसंग्रामच्या महिला जिल्हाध्यक्षा आणि पदाधिकाऱ्यांनी आज येथे (beed) दिला. (Vinayak Mete Latest Marathi News)

आज विनायक मेटे यांच्या अस्थी देशातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र राक्षसभुवन येथील गोदावरी गंगा नदीत विसर्जित करण्यात आल्या. यावेळी मेटे यांची कन्या आकांक्षा, बंधू त्रिंबक यांच्यासह बहिणी, नातेवाईक आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. विनायक मेटे यांच्या अकाली निधनाने मोठी राजकीय आणि सामाजिक हानी झाली असून न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे असं मत आजही अनेकांनी नदी काठी व्यक्त केले.

दरम्यान शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्त्यांनी मेटे यांच्या वाहनास तीन ऑगस्ट दरम्यान शिक्रापूर या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न झाला होता. हा घाट पूर्वीपासूनचं होता. त्यामुळं मेटे साहेबांच्या अपघाताची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सखोल चौकशी करावी. दोषींवर कडक कारवाई करावी. अन्यथा शिवसंग्राम महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरले असा इशारा दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT