shivsainik bhagwan kale, matoshree, shivena, uddhav thackeray, Shiv Sena Latest News, uddhav thackeray news today, Latest Marathi News Update saam tv
महाराष्ट्र

Shivsena : 'माताेश्री' बाहेर सेना पदाधिकाऱ्यास फुटला घाम; हृदयविकाराचा झटक्याने झाला मृत्यू

आज (गुरुवार) सकाळी राहात्या घरी कसारा गावी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साम न्यूज नेटवर्क

- फैय्याज शेख

शहापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटण्यासाठी गेलेल्या शहापूर (Shahapur) तालुक्यातील पदाधिकाऱ्यांमधील भगवान काळे यांचे बुधवारी (ता. सहा जूलै) मुंबईतच निधन झाले. यामुळे शहापूर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये (shivsainik) शाेककळा पसरली. (Shivsena Latest Marathi news)

भगवान काळे (bhagwan kale) हे वाशाळा गावातील पदाधिकाऱ्यांना स्वत:च्या गाडीतून मातोश्रीवर घेऊन गेले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते बैठकीसाठी आत गेले नाहीत. काही शिवसैनिकांनी दिलेल्या माहितीनूसार काळे हे तेथे पोहचताच त्यांना घाम येऊ लागला. त्यामुळे ते बाहेर एका खुर्चीतच बसले.

त्यानंतर काळे यांना कलानगर येथील रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. आज (गुरुवार) सकाळी राहात्या घरी कसारा गावी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : ऑडिशनदरम्यान प्रायव्हेट व्हिडीओ बनवला, अडल्ट साइटवर टाकून..., प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभव

Maharashtra News Live Update: दादांना आदरांजली वाहण्यासाठी आज मतदानासाठी यावं - सुप्रिया सुळे

आयपीएल स्पर्धेत मोठा ट्विस्ट; ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वैभव सूर्यवंशीने विराट कोहलीला मागे टाकलं

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट; सरकारी कर्मचाऱ्यांकडून महत्त्वाची मागणी; वाचा सविस्तर

Akola : दाताने उचललं, गरागरा फिरवलं; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भोंदू चेतनविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT