shivsaina protest in front of navneet rana and ravi rana house in amaravati  Saam Tv
महाराष्ट्र

अमरावतीमध्ये रवी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिक आक्रमक

शिवसेनेचे कार्यकर्ते अमरावतीमध्ये राणा यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

अमरावती: खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी मातोश्री बाहेर हनुमान चालीसाचे चालिसा पठण करण्याचा इशारा दिला होता. याप्रकरणावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. अमरावतीमध्ये आज शिवसैनिकांनी (Shivsena) आमदार रवी राणा यांच्या घरासमोर मोर्चा काढून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. (shivsaina protest in front of navneet rana and ravi rana house in amaravati )

शिवसैनिकांनी (Shivsena) अमरावतीमध्ये राजापेठ परिसरापासून गंगा सावित्री निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, शंकर नगर भागात पोलिसांनी शिवसैनिकांचा मोर्चा अडवला आहे. काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राज्यभरात भोंग्याचा वाद तापलेला पाहायला मिळत आहे.

यावेळी नवनीत राणा यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 'देवाचं नाव स्मरण करण्यासाठी आठवण करुन दिल्यामुळे जर आमचा शिवसैनिकांकडून निषेध होणार असेल तर, आमची काही हरकत नाही. देवाच्या नावासाठी आमचा निषेध कबुल आहे. आमच्या धर्मासाठी आम्ही काही करु शकतो. देवाचं नाव घेण्यासाठी आमच्या घरावर मोर्चा काढणाऱ्यांचं आम्ही स्वागत करतो.' 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हनुमान चालीसाचं पठण केव्हा करणार', असा सवाल नवनीत राणा यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

यावेळी राणा यांच्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यांच्या स्वागतासाठी शरबत, हनुमान चालिसा भेट म्हणून देणार होते. मात्र पोलिसांनी त्यांना घरापर्यंत पोहचू दिले नाही पोलिसांनी सर्व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT