Beed Political News Saam tv
महाराष्ट्र

Beed Political News: शरद पवारांनी बैठक घेताच बीडमधील राजकारण फिरलं; बीआरएस राज्य समन्वयकांनी दिला राजीनामा

Beed Political News: राज्यात प्रवेश घेण्यासाठी जवळपास ८ दलाल एजंट नेमले असल्याचा गंभीर आरोप करत बीआरएस पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे

विनोद जिरे

Sharad pawar News: गेल्या ६ महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करत बीआरएसमध्ये प्रवेश केलेले बीआरएस समन्वयक शिवराज बांगर यांनी बीआरएस ही भाजपची बी टीम आहे. त्यांनी राज्यात प्रवेश घेण्यासाठी जवळपास ८ दलाल एजंट नेमले असल्याचा गंभीर आरोप करत पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यासोबत शिवराज बांगर यांच्यासह बबन गीते यांची बैठक झाली होती. (Latest Marathi News)

शिवराज बांगर राजीनामा देताना म्हणाले, 'बीआरएसने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसमधील अस्वस्थ मंडळींना गळ घालण्यासाठी काही एजंट नेमले आहेत. एजंट हे आर्थिक आणि राजकीय आमिष दाखवून त्यांचे प्रवेश घडवून आणत आहेत. प्रवेश देताना वेगळी भूमिका आणि प्रवेश दिल्यानंतर वेगळी भूमिका असे बीआरएसचे धोरण आहे'.

'काही दिवसाचा अनुभव आल्यानंतर आमचा भ्रमनिरास झाला आहे. महाराष्ट्रातील जनतेवर ही वेळ येऊ नये म्हणून आम्ही वेळीच सर्वांना सावध करणार आहोत, असेही शिवराज बांगर हे यावेळी म्हणाले. दरम्यान, शिवराज बांगर यांच्यानंतर आता धाराशिवमधील काही पदाधिकारीही बीआरएसला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

धनंजय मुंडे यांची डोकेदुखी वाढणार, कारण?

दरम्यान, अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांची डोकेदुखी आता वाढणार असल्याची चर्चा झाली आहे . राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता थेट परळीत पर्याय उभा करायला हालचाली सुरू केल्या आहेत. परळीच्या पंचायत समितीचे माजी सभापतीसह बीआरएसच्या अनेक नेत्यांचा बीडमध्ये उद्या होणाऱ्या जाहीर सभेत प्रवेश होणार असल्याची माहिती हाती आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heatwave Alert : उष्णतेच्या लाटेचा तडाखा! विदर्भाला 'यलो अलर्ट'; या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी, वाचा अपडेट

Madhuri Dixit Birthday: माधुरीला अभिनय नाही 'या' क्षेत्रात करिअर करायचं होतं; अशी बनली बॉलिवूडची 'धक-धक गर्ल'

बंगळूरू ते हैदराबाद प्रवास फक्त २ तासांत, तर चेन्नईला पोचाल ७५ मिनिटात; हाय स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज असल्यास शरीरात दिसतात हे ६ मोठे बदल

मेट्रो अधिकाऱ्याच्या कृत्याने मुंबई हादरली; इंजिनीअर असलेल्या महिलेवर ऑफिसमध्येच अत्याचार

SCROLL FOR NEXT