Satara News, Shivendraraje Bhosale, Shambhuraj Desai saam tv
महाराष्ट्र

Satara News : किस्साच झाला ! शिवेंद्रराजे पाेहचताच उदयनराजेंचा फोन कट, मंत्री देसाई लागले हसू

आज दाेन्ही नेत्यांमध्ये भेट झाली.

Siddharth Latkar, ओंकार कदम

Satara News : आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास अचानक मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. ही भेट मंत्री देसाईंच्या निवासस्थानी झाली. दरम्यान आमदार भाेसले आणि मंत्री देसाई (shambhuraj desai) यांच्यात दिर्घकाळ चर्चा झाली. या दाेन्ही नेत्यांच्या भेटीची चर्चा (satara) शहरात रंगली हाेती. (Shivendraraje Bhosale Latest Marathi News)

सातारा जिल्ह्यात सध्या मजूर फेडरेशनच्या निवडणुकीचा प्रचाराचा धुरळा उडत आहे. प्रत्येक जण आपली संपुर्ण ताकद पणाला लावत आहे. आज दुपारी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना भेटायला आमदार शिवेंद्रराजे अचानक त्यांच्या कोयना दौलत या साताऱ्यातील निवासस्थानी गेले.

शिवेंद्रराजे तिथे पोहचण्याचा काही वेळ आधी खासदार उदयनराजे यांचे निकटवर्ती सुनील काटकर हे पोहचले होते. या वेळी त्यांनी शंभूराज देसाई यांना उदयनराजेंचा फोन जोडून दिला. हा फोन सुरू असतानाच अचनाक आमदार शिवेंद्रराजे देसाईं समोर उभे राहिले. (Maharashtra News)

यावेळी अचानक फोन कट झाला. शिवेंद्रराजे येताच उदयनराजेंचा फोन कट झाल्याने उपस्थितांमध्ये या किस्स्याची जोरदार चर्चा रंगली. आता या निवडणुकीत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई नेमकी कोणाची बाजू घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

shivendrasinhraje bhosale and shambhuraj desai

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT